शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

खरीप कांदा, रडविणार यंदा!

By admin | Updated: July 16, 2014 01:24 IST

पावसाची हुलकावणी : फलटणचा पश्चिम भाग नापेर राहण्याची भीती

आदर्की : जोरदार वादळी वारे, गारपीट आणि पावसाने झालेल्या नुकसानीनंतरही आदर्की भागातील शेतकऱ्यांनी शेतीची पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. बळीराजा पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र जुलैचा मध्य ओलांडल्यानंतरही अद्याप पाऊस सुरु न झाल्याने बळीराजा धास्तावला आहे.खरीप हंगामात या भागात प्रामुख्याने हळवा कांदा, मका, बाजरी आदी पिके घेतली जातात. पाऊस अद्याप सुरू झाला नसल्याने खरीप नापेर राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भागात होणारे प्रामुख्याने कांद्याचे पीक शेतकऱ्याला चांगला आधार देऊन जाते. त्याद्वारे नंतरच्या रब्बी पिकांचे नियोजन करणे आर्थिकदृष्ट्या सोयीचे ठरत असल्याने खरिपातील कांद्याला नेहमीच प्राधान्य दिले जाते. पावसाअभावी अद्याप कांद्याच्या लागणी होऊ शकल्या नसल्याने आर्थिक साथ देणारा कांदा आणि कुंटुबाच्या पालनासाठी होणारी बाजरी, जनावरांसाठी होणारी मका,पावसाअभावी अद्याप पेरणी न झाल्याचे सर्वच आघाड्यावर शेतकऱ्यांची कोंडी होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भागात होणाऱ्या परतीच्या मान्सुनवरच येथील रब्बीचे पिके घेतली जातात. परतीचा मान्सून बेभरवशी असल्याने या भागातील शेतकरी मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या पावसावर घेतलेल्या खरीप पिकांचाच आधार मानतो आणि यावर्षी खरीप नापेर राहिला तर काय या विंवंचनेत शेतकरी आहे. (वार्ताहर)