शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मिळकतींच्या संकलित करावरील व्याजात शासनाने सूट द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : महाराष्ट्रात २०१९-२० व २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये कोरोनाच्या प्रभावाने नागरिक आर्थिक संकटात सापडलेले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : महाराष्ट्रात २०१९-२० व २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये कोरोनाच्या प्रभावाने नागरिक आर्थिक संकटात सापडलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना संकलित कराच्या थकबाकीवरील व्याज पूर्णपणे माफ करावे. तसेच शासनाने त्या व्याजवसुलीची सक्ती स्थानिक स्वराज्य संस्थांना करू नये, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

देशासह महाराष्ट्रात फेब्रुवारी २० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे मार्च २० ते आजपर्यंत संपूर्ण लॉकडाऊनची स्थिती आहे. बहुतांशी भागांत रोजगार, उद्योगधंदे, व्यापार बंद असल्यामुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आर्थिक टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. सर्वच नगरपालिकांच्या क्षेत्रामधील नागरिकांचे रोजगार व उद्योगव्यवसाय बंद झाल्यामुळे व त्यांना आर्थिक उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन उपलब्ध नाही. त्यांच्याकडून पालिकेची संकलित कराची रक्कम मोठ्या प्रमाणात थकलेली आहे. या थकबाकीवर नगरपालिका कायद्याने २ टक्के शास्ती (व्याज) लावण्यात येते. थकीत करावर शास्ती लावल्यामुळे कराच्या रकमेत वाढ झालेली आहे. कोरोनामुळे बिकट आर्थिक परिस्थिती विचारात घेता बहुतांश: मिळकतधारकांना नियमित कर व व्याज भरणे अडचणीचे झाले आहे, तर व्याजाची रक्कम माफ करण्याबाबत पालिकास्तरावर निर्णय घेता येत नाही. नागरिकांकडून अधिनियमातील तरतुदीनुसार एकत्रित संकलित कर वसूल करण्यास पालिकांना अडचण येत आहे. सक्तीने वसुली केल्यास नागरिकांच्या मनात पालिकेच्या विरुद्ध रोष निर्माण होऊन त्याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी कर न भरल्यास पालिकेच्या १०० टक्के वसुली व उत्पन्नावर परिणाम होऊन विकासकामांसह विविध योजनांच्या अंमलबजावणीस खीळ बसेल. या परिणामांचा विचार करता एकत्रित संकलित करावरील व्याजाची रक्कम माफ केल्यास पालिकेला एकरकमी मुद्दल वसूल होऊन विकासकामांसाठी निधी उपलब्ध होईल. महाराष्ट्र पालिका अधिनियमातील नियमांनुसार शास्ती व दंड माफ करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. तरी शासनाने परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेतल्यास नागरिकांची आर्थिक परिस्थिती सावरण्यास मदत होणार आहे. म्हणून राज्य शासनाकडे मागणी करावी लागत आहे. याबाबतचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पत्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहितीही शिंदे यांनी या पत्रकात दिली आहे.