शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

Satara: आम्ही तुमची 'लाडकी बहीण' नाही का?, वृद्ध महिलांचे कऱ्हाडात आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 13:21 IST

कऱ्हाड : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली असली तरी योजनेतील अटीमुळे ६५ वर्षांच्या पुढील ...

कऱ्हाड : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली असली तरी योजनेतील अटीमुळे ६५ वर्षांच्या पुढील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. शिवाय एका कुटुंबातील केवळ दोनच महिला या योजनेसाठी पात्र असतील, हा निकषही महिलांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे आम्ही तुमची लाडकी बहीण नाही का? असा सवाल ६५ वर्षांपुढील महिलांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, वयाची अट रद्द करून सरसकट महिलांना या योजनेचा लाभ द्या, अशी मागणी जोर धरत आहे. विविध पक्ष, संघटनांनी यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.राज्य शासनाने दि. १ जुलैपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली आहे. या योजनेच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील महिलांची माहिती घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. मात्र योजनेतील जाचक अटीमुळे ६५ वर्षांच्या पुढील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. शिवाय अनेक महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. वयाच्या साठीनंतर आजारपण शिवाय कुटुंब विभक्त झाली असल्याने वृद्धाच्या पालनपोषणाचा प्रश्न उपस्थित होतो. सरसकट महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या, अशी मागणी होत आहे.दरम्यान, रयत क्रांती संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर वयोवृद्ध महिलांनी धडक मारली. मोर्चाचे नेतृत्व रयत क्रांती संघटनेचे कराड तालुका अध्यक्ष अशोक लोहार यांनी केले होते. यावेळी आम्हाला योजनेचा लाभ द्या, अशी मागणी ६५ वर्षांपुढील वयोवृद्ध महिलांनी केली आहे.

आरपीआय महिला आघाडीचे निवेदनदरम्यान, आरपीआय महिला आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष माधुरी टोणपे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी हे निवेदन दिले. ६५ वर्षांवरील महिलांवर सरकारने अन्याय केला आहे. त्यांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले आहे. राज्यातील ६५ वर्षांवरील कोणत्याही महिलेला योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जाऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सविता काकडे, सुमन शिंदे, मीरा भांगे, जगूबाई काकडे, सोनाबाई गदाळे, विद्या बनसोडे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWomenमहिला