पूल पाहणीदरम्यान मधमाशांचा हल्ला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुखरुप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 15:21 IST2026-05-13T15:21:13+5:302026-05-13T15:21:56+5:30

काही पोलिस कर्मचारी, कार्यकर्ते आणि पत्रकारांना मधमाशांच्या दंशामुळे किरकोळ दुखापत

Deputy Chief Minister Eknath Shinde and his convoy were attacked by bees during an inspection of the new cable bridge connecting the Tapola Ahir Kandati Koyna section of Satara district | पूल पाहणीदरम्यान मधमाशांचा हल्ला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुखरुप

संग्रहीत छाया

सातारा / बामणोली : सातारा जिल्ह्यातील तापोळा - अहिर - कांदाटी - कोयना विभागाला जोडणाऱ्या नव्या केबल पुलाच्या पाहणीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आणि त्यांच्या ताफ्यावर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना रविवार, दि. ११ मे रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे पुलावर उपस्थित अधिकारी, पोलिस कर्मचारी, कार्यकर्ते आणि पत्रकारांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम कांदाटी खोऱ्यातील उचाट गावात श्री कुंभाळजाई देवी मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी तापोळा - अहिर - कांदाटी - कोयना परिसराला जोडणाऱ्या नव्या ‘सीलिंग ब्रिज’ची पाहणी केली. पुलाच्या कामाची माहिती घेत असताना परिसरातील मधमाशांचे पोळे अचानक अस्वस्थ झाले आणि मधमाशांनी उपस्थितांवर हल्ला चढवला.

या अचानक झालेल्या प्रकारामुळे उपस्थितांची एकच धावपळ उडाली. अनेकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी पुलावरून सुरक्षित स्थळी धाव घेतली. काही पोलिस कर्मचारी, कार्यकर्ते आणि पत्रकारांना मधमाशांच्या दंशामुळे किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या घटनेतून सुखरूप बचावले. घटनेनंतर प्रशासनाने परिसराची पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Web Title : पुल निरीक्षण के दौरान एकनाथ शिंदे पर मधुमक्खियों का हमला; सुरक्षित।

Web Summary : सतारा में पुल निरीक्षण के दौरान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उनके काफिले पर मधुमक्खियों ने हमला किया। कुछ लोगों को मामूली चोटें आईं, लेकिन शिंदे सुरक्षित बच गए। घटना से अस्थायी अराजकता हुई। अधिकारी अब सुरक्षा सावधानी बरत रहे हैं।

Web Title : Bees attack Eknath Shinde during bridge inspection; he's safe.

Web Summary : During a bridge inspection in Satara, bees attacked Deputy Chief Minister Eknath Shinde and his convoy. While some sustained minor injuries, Shinde escaped unharmed. The incident caused temporary chaos. Authorities are now taking safety precautions.