शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपातळीत घट चिंता वाढविणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:40 IST

फलटण : एप्रिल महिना सुरू झाला आणि उन्हाच्या झळांनी शेतशिवारे तापू लागली. रानात असणारी गव्हाच्या पिकाची काढणी जवळजवळ ...

फलटण : एप्रिल महिना सुरू झाला आणि उन्हाच्या झळांनी शेतशिवारे तापू लागली. रानात असणारी गव्हाच्या पिकाची काढणी जवळजवळ पूर्ण होत आली आहे. गेल्या वर्षी मुबलक पाऊस झाला असला तरी यंदा मात्र मार्चच्या सुरुवातीलाच पाण्याने तळ गाठला आहे. परिसरातील काशीदवाडी, वडजल, निंभोरे, नांदल, सुरवडी या गावांमध्ये भूजल पातळी खालावत चालली असून विहिरीच्या पाणीपातळीत लक्षणीय घट दिसून येत आहे.

गेल्या वर्षी या दिवसांत पाणीपातळी चांगली टिकून होती. या वर्षी मात्र कूपनलिकांचे पाणी तासाभर पण टिकत नाही.

भरपूर पाऊस पडूनसुद्धा मार्चच्या सुरुवातीलाच विहिरी आणि बोअरवेल यांचे पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे ऊसलागणीला पाणी देताना शेतकऱ्यांना कमालीची कसरत करावी लागत आहे. जूनपर्यंत ऊस व कडवळ पिकांना जगवताना शेतकरी हैराण होत आहेत. उपलब्ध पाणी आणि पीक यांचा समतोल कसा साधायचा, हा प्रश्न शेतकऱ्यांना सोडवावा लागत आहे.

परिसरातील तलाव कोरडे पडू लागल्याने गावकरी चिंतेत आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होणार आहे. गुरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागणार आहे. परिसरात गेल्या दहा दिवसांत अचानक पाणीपातळी घटल्याचे शेतकरी सांगतात. बोअरवेल एकदमच कोरड्या पडत आहेत.

निसर्गाने भरभरून दिले; परंतु नियोजन व उपाययोजना यांच्याअभावी दरवर्षी शेतकऱ्यांना या दिवसात पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. एका बाजूला वाढता कोरोना आणि दुसऱ्या बाजूला घटती पाणीपातळी नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे.

गेल्या पावसाळ्यात भरपूर पाऊस पडूनही या वर्षी पाणीपातळी खालावली आहे. यापाठीमागचे वैज्ञानिक कारण शोधले पाहिजे; तसेच पाणी साठवण क्षमता वाढविली पाहिजे.

- संदीप कांबळे, ग्रामस्थ, सुरवडी