शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

कऱ्हाडात कोरेगावच्या घटनेचे पडसाद, वाहने, दुकानांची तोडफोड, जमाव आक्रमक, तुफान दगडफेक;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 4:07 PM

कऱ्हाड : कोरेगाव-भीमा येथील घटनेचे पडसाद मंगळवारी कऱ्हाडात उमटले. जमावाने दुकाने, वाहनांची प्रचंड तोडफोड केली. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोरेगाव-भीमा येथे सोमवारी दगडफेक तसेच तोडफोड झाली होती. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कऱ्हाड शहरात शेकडोंचा जमाव जमला. या जमावाने बसस्थानकासमोरील हॉटेल अलंकारसह अन्य दुकानांवर ...

ठळक मुद्देकऱ्हाडात जमावाकडून दुकाने, वाहनांची प्रचंड तोडफोड जोरदार घोषणाबाजी, कोरेगाव-भीमा येथील घटनेचा निषेध सायंकाळपर्यंत तणावाचे वातावरण, जमावाला शांत राहण्याचे आवाहनकडक पोलिस बंदोबस्त तैनात

कऱ्हाड : कोरेगाव-भीमा येथील घटनेचे पडसाद मंगळवारी कऱ्हाडात उमटले. जमावाने दुकाने, वाहनांची प्रचंड तोडफोड केली. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोरेगाव-भीमा येथे सोमवारी दगडफेक तसेच तोडफोड झाली होती. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.

मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कऱ्हाड शहरात शेकडोंचा जमाव जमला. या जमावाने बसस्थानकासमोरील हॉटेल अलंकारसह अन्य दुकानांवर दगडफेक केली. त्यानंतर जमाव बसस्थानक चौकातून पुढे विजय दिवस चौकाकडे गेला. तेथेही उघड्या दुकानांवर दगडफेक करण्यात आली. विजय दिवस चौकात उभ्या असणाऱ्या प्रवासी वाहतूक रिक्षांवरही जमावाने दगडफेक केली. त्यामध्ये रिक्षांच्या काचा फुटल्या.

उपजिल्हा रुग्णालयासमोरील चौकातून शेकडोंचा जमाव आंबेडकर चौकाकडे गेला. आंबेडकर चौकातच जमावाने ठिय्या मांडला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत कोरेगाव-भीमा येथील घटनेचा निषेध करण्यात आला.

पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. या घटनेमुळे शहरात सायंकाळपर्यंत तणावाचे वातावरण होते. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस