Join us  

"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 12:50 PM

राखीचा EX पती रितेश सिंगने तिच्या प्रकृतीबद्दल महत्वाचे अपडेट दिले आहेत. त्यामुळे राखीच्या चाहत्यांना काळजी वाटली आहे (rakhi sawant, ritesh singh)

अभिनेत्री राखी सावंत सध्या चांगलीच चर्चेत आहे. राखी सावंत काहीच दिवसांपुर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिच्याबद्दल काळजी वाटली. राखी सावंतला नेमकं काय झालंय यासंबंधी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. राखीला छातीत दुखू लागल्याने तिला रुग्णालयात दाखल केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. आता राखी सावंतच्या प्रकृतीबद्दल तिचा Ex पती रितेश सिंगने खळबळजनक खुलासा केलाय. 

राखीचा Ex पती रितेश म्हणाला, "तिला छातीत आणि पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनेक चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांना राखीच्या गर्भाशयात गाठ आढळून आली. हा कर्करोग (कॅन्सर) असावा असा संशय आहे. परंतु आणखी काही टेस्ट बाकी आहेत. त्या झाल्यानंतर खरं काय ते समजेल". रितेशने राखीसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे.

न्यूज 18 शी रितेशने पुढे खुलासा केला की, 'छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर राखीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टर तिची काळजी घेत आहेत. त्यांना तिच्या गर्भाशयात गाठ सापडली. तिच्या पोटातही दुखत होते. त्यामुळे कॅन्सर होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. चाचण्या केल्या जात आहेत. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करायला सांगितली आहे, पण त्यांना आधी कॅन्सर आहे की नाही हे तपासायचे आहे."

टॅग्स :राखी सावंतमराठीमराठी अभिनेता