Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीची प्रचारसभा सुरू आहे. काल ठाकरे गटाची मुंबईत सभा झाली. या सभेत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आमदार सदा सरवणकर यांच्यावर निशाणा साधला.
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
काल माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांना इशारा दिला. "गणपती बाप्पााच्या मिरवणुकीत बंदूक काढली आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी बंदूक चालवली हे त्यांचं हिंदूत्व आहे का? आमच्या गणपती बाप्पांच्या मिरवणुकीत तुम्ही बंदूक काढली तुमच्यावर युएपीए कायदा मी टाकणार आहे, सोडणार नाही. पोलीस स्टेशनमध्ये फायरींग केले तुम्हाला आत टाकणार,असा इशारा आदित्य ठाकरे यांनी सदा सरवणकर यांना दिला.
"या सगळ्यांना शिवसेनेने पद दिली. शिवसेनेमुळे मोठी झाली. महापालिकेचं स्टॅन्डींग कमिटीचे पदही दिले होते. सगळं काही खायचं होतं ते खाल्ल, अपचन तुम्हाला झालं म्हणून तुम्ही गुजरातला पळून गेलात. हिंमत जर करायची असेल तर वार समोरुन करा. मागून वार करणारे तुम्ही स्वत:ला शिवसेना म्हणून कसे घेऊ शकता, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.
"ही लढाई शिवसेना विरुद्ध शिवसेना नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही एकच शिवसेना आहे. शिवसेना विरुद्ध चिंदीचोर अशी लढाई आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. या दोन वर्षात अनेक घोटाळे समोर आणले. मुंबईत रस्त्याचा मोठा घोटाळा झाला. मुंबईत या घोटाळ्याबाजांनी एकही रस्ता पूर्ण केलेला नाही. आपण आपल्या कामाच्या जीवावर आतापर्यंत मुंबईतील निवडणुका जिंतक आहे, असंही ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसेनेने (Shiv Sena) आतापर्यंत मुंबईत विकासकामे केली आहेत. दोन अडीच वर्षापूर्वी मिंधेंच्या हातात मुंबई आली तेव्हापासून रस्त्यावर गोंधळ घालत आहेत. माझ्या तर कानावर आलं आहे की, माहिमचे जे आमदार आहेत ते पाच, दहा हजार रुपयांसाठी दुकानदारांना त्रास देत आहेत. शाळा,कॉलेजांनाही सोडत नाहीत, असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला.