भारतीय फुटबॉल संघाचा स्टार खेळाडू आणि कर्णधार सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कुवेतविरुद्धच्या फिफा विश्वचषक पात्रता फेरीनंतर तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलला कायमचा निरोप देणार आहे. सुनील छेत्रीने आज १६ मे रोजी कुवेत विरुद्ध फिफा विश्वचषक २०२६ च्या पात्रता फेरीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली.
Blog : सुनील छेत्री! भारतीयांच्या कौतुकाला, प्रेमाला मुकलेला 'खरा' नायक
सुनील छेत्रीच्या निवृत्तीमुळे भारतीय फुटबॉलमध्ये एक पोकळी निर्माण होईल. सुनिल छेत्रीने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने निवृत्तीची घोषणा केली. सुनील छेत्रीने अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे. ३९ वर्षीय छेत्रीने २० वर्षांच्या कारकिर्दीत भारतासाठी १५० सामने खेळले आणि ९४ गोल केले.
सुनील छेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओत भावूक झाल्याचे दिसत आहे. निवृत्तीच्यावेळी त्याला त्याच्या पदार्पणाच्या सामन्याची आठवण झाली. यावेळी त्याने प्रशिक्षकांची आठवण काढली.