शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 21:14 IST

पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रेरणेने राजकारणात आलेले भुलाई भाई जनसंघाच्या तिकिटावर दोनवेळा आमदार झाले.

BJP Bhulai Bhai: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री नारायण उर्फ भुलाई भाई यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. कप्तानगंज येथे सायंकाळी 6 वाजता वयाच्या 111 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोव्हिड काळात भुलाई भाईंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन करुन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती, त्यावेळी ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. ​​भुलाई भाई जनसंघाच्या तिकिटावर आमदार झाले होते. दरम्यान, सोमवारी त्यांची प्रकृती खालावली, तेव्हापासून ते पगार छपरा येथील त्यांच्या घरी ऑक्सिजनवर होते.

कोण होते भुलाई भाई?श्री नारायण उर्फ ​​भुलाई भाई हे भारतीय जनता पक्षाचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते होते. भुलाई भाई दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रेरणेने राजकारणात आले आणि 1974 पासून कुशीनगरच्या नौरंगिया मतदारसंघातून सलग दोनदा जनसंघाचे आमदार झाले. जनसंघ पुढे भाजप झाल्यानंतरही ते पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते होते. 2022 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर भुलई भाई शपथविधी समारंभात विशेष पाहुणे म्हणून लखनौला पोहोचले होते. लखनौ येथील कामगार परिषदेत अमित शाह यांनी मंचावरुन खाली उतरुन भुलई भाईंचा गौरव केला होता.

भगवा गमछा भुलाई भाईंची ओळखभारतीय जनसंघाची स्थापना झाली तेव्हा श्री नारायण उर्फ ​​भुलाई भाई एम.ए.चे विद्यार्थी होते. त्यावेळी दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रभावाने त्यांनी तत्त्वांच्या मार्गावर चालण्यास सुरुवात केली तेव्हा ते या तत्त्वांना नेहमीच चिकटून राहिले. एम.ए.नंतर त्यांनी एम.एड करुन शिक्षणाधिकारी झाले, पण 1974 मध्ये त्यांनी नोकरी सोडली आणि राजकारणात येऊन देश आणि समाजासाठी काहीतरी करण्याचे ठरवले. त्याच वर्षी भारतीय जनसंघाने त्यांना उमेदवार केले आणि भुलाई भाई आमदार झाले. भगवा गमछा हीच भुलाईभाईंची ओळख होती.

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश