IPL 2026 GT vs RCB Bhuvneshwar Kumar Record : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या आयपीएल २०२६ च्या ४२ व्या सामन्यात भारताचा ‘स्विंग किंग’ भुवनेश्वर कुमार याने नवा इतिहास रचला. जे बुमराहला जमलं नाही तो डाव साधत तो टी-२० तील टीम इंडियाचा नंबर वन गोलंदाज ठरला आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध धावांचा बचाव करताना भुवीने २८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर त्याने पर्पल कॅपवर पुन्हा कब्जा करताना टी २० क्रिकेटमध्ये ३५० विकेट्सचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा भारताचा तो पहिला जलदगती गोलंदाज ठरला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात पॉवरप्लेमध्ये साई सुदर्शनच्या रुपात पहिली विकेट आपल्या खात्यावर जमा करताच त्याने टी-२० मध्ये ३५० विकेट्सचा पल्ला गाठला. शुभमन गिल आणि जोस बटलरच्या रुपात घेतलेल्या विकेट्सनंतर त्याच्या खात्यात आता ३५२ विकेट्सची नोंद झाली आहे. ३२५ सामन्यातील ३२४ डावात त्याने हा आकडा गाठला आहे.
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
यंदाच्या हंगामात पर्पल कॅपच्या शर्यतीत पुन्हा अव्वलस्थानी
गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यातील कामगिरीसह भुवनेश्वर कुमारनं ९ सामन्यात १७ विकेट्स आपल्या खात्यात जमा करत पुन्हा एकदा पर्पल कॅपवर कब्जा केला आहे. या यादीत एशान मलिंगा (१५ विकेट्स ९ सामने) आणि जोफ्रा आर्चर (१४ विकेट्स ९ सामने) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.सर्वाधिक विकेट्सचा विक्रम चहलच्या नावावर
टी २० क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम युझवेंद्र चहलच्या नावावर आहे. चहलने आतापर्यंत ३९१ विकेट्स घेतल्या आहेत. त्यापाठोपाठ भुवीचा नंबर लागतो. क्रिकेट जगतात गाजावाजा असलेला जसप्रीत बुमराह या यादीत ३४७ विकेट्स घेत तिसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय पीयूष चावलनं ३२७ विकेट्स घेतल्या आहेत.
Web Summary : Bhuvneshwar Kumar achieved a T20 milestone, surpassing Bumrah by claiming 350 wickets, becoming the first Indian fast bowler to do so. He secured the purple cap again with a stellar performance against Gujarat Titans.
Web Summary : भुवनेश्वर कुमार ने टी20 में बुमराह को पछाड़कर 350 विकेट लेकर एक मील का पत्थर हासिल किया और ऐसा करने वाले पहले भारतीय तेज गेंदबाज बने। गुजरात टाइटन्स के खिलाफ शानदार प्रदर्शन के साथ उन्होंने फिर से पर्पल कैप हासिल की।