Join us

देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 11:49 AM

आयपीओच्या निमित्तानं ओटीटी प्लॅटफॉर्म उल्लू चर्चेचा विषय ठरला होता. परंतु आता उल्लू अॅपचे मालक विभू अग्रवाल यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

आयपीओच्या निमित्तानं ओटीटी प्लॅटफॉर्म उल्लू (OTT Platform Ullu) चर्चेचा विषय ठरला होता. परंतु आता उल्लू अॅपचे मालक विभू अग्रवाल यांनी एक मोठी घोषणा केली आहे. विभू अग्रवाल यांनी देशातील पहिलं पौराणिक ओटीटी अॅप 'हरि ओम' सुरू करण्याची घोषणा केली आहे. देशातील हे पहिलंच पौराणिक ओटीटी अॅप असणार आहे. 

जून २०२४ मध्ये हरि ओम हे अॅप लॉन्च करण्यात येणार आहे. तसंच यामध्ये २० पेक्षा अधिक पौराणिक गोष्टींचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याशिवाय या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ऑडिओ आणि व्हिडीओ फॉर्मेटमध्येही भजन पाहता आणि ऐकता येणार आहेत. याशिवाय प्रथमच, मुलांना पौराणिक कथांवरील क्युरेटेड ॲनिमेटेड सामग्री अनुभवता येणार असल्याचंही सांगण्यात आलंय. 

 

यापूर्वी उल्लूच्या आयपीओमुळे चर्चा 

OTT प्लॅटफॉर्म Ullu Digital त्यांचा IPO आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती यापूर्वी समोर आली आहे. यासाठी कंपनीनं ड्राफ्ट पेपर्स बाजार नियामक सेबीकडे सादर केले होते. कंपनीला आयपीओद्वारे १३५ ते १५० कोटी रुपये उभे करायचे असल्याचंही सांगण्यात आलं होतं. पब्लिक इश्यूमध्ये सुमारे ६२.६ लाख नवीन शेअर्स जारी केले जाणार असल्याचीही माहिती समोर आली होती. उल्लू डिजिटलला त्यांच्या आयपीओसाठी सेबीकडून मंजुरी मिळाल्यास, तो आतापर्यंतचा सर्वात मोठा एसएमई आयपीओ असेल असंही म्हटलं जात होतं.

टॅग्स :व्यवसाय