शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री अन् रमाई घरकुल योजनेतील घरकुले पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:39 IST

फलटण : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत राबविलेल्या आवास अभियानांतर्गत प्रधानमंत्री व रमाई ...

फलटण : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत राबविलेल्या आवास अभियानांतर्गत प्रधानमंत्री व रमाई आवास योजनेंतर्गत अपूर्ण २५७ घरकुलांपैकी १५५ घरकुले पूर्ण झाली आहेत. उर्वरित घरकुले पूर्ण करावेत, अशा सूचना आमदार दीपक चव्हाण यांनी केल्या.

फलटण पंचायत समितीच्या अधिनस्त विभागाकडील विकासकामे/योजनांच्या आढावा बैठकीत अध्यक्षतेखाली ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, माणिकराव सोनवलकर, पंचायत समिती सभापती शिवरुपराजे खर्डेकर, उपसभापती रेखाताई खरात, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब ठोंबरे, सचिन रणवरे, संजय कापसे, संजय सोडमिसे, प्रतिभाताई धुमाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे पवार, सहायक गटविकास अधिकारी विनायक गुळवे उपस्थित होते.

बांधकाम विभागाकडील जनसुविधा, स्थानिक विकास, अंगणवाडी व अन्य सर्व योजनेतील २०१९-२०२० मधील मंजूर कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करावीत. जी पूर्ण होणार नाहीत त्यांचे रद्द प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिल्या.

राज्यस्तरीय आदर्श शाळा प्रकल्पासाठी तरडगाव व माझेरी (पुनर्वसन) या दोन शाळांची निवड झाली आहे. त्याबाबत शाळा व्यवस्थापन समित्यांची बैठक घेऊन शैक्षणिक जनजागृती करणेबाबत आमदार दीपक चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

१८ फेब्रुवारी रोजी माझेरी २, हिंगणगाव २, शेरेचीवाडी (हिं) २, मुंजवडी १, आसू १, खटकेवस्ती १, सांगवी १ या गावांत दहा प्राथमिक शाळा खोल्या बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळाल्या आहेत. तालुक्यातील ज्या ३७ प्रा. शाळांमध्ये शौचालये नाहीत त्याबाबतचे प्रस्ताव तातडीने दाखल करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे पवार यांनी संबंधितांना दिल्या.

फलटण तालुक्यात आजअखेर १० हजार २६० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. सध्या १५० रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पोटे यांनी निदर्शनास आणून दिले.

सर्व विभागांकडील सुरू नसलेली कामे तत्काळ सुरू करावीत. ३१ मार्चअखेर सुरू असलेली तसेच नसलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करून प्राप्त अनुदान खर्च करावे, निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी केल्या.

गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे पवार यांनी प्रास्तविक केले. आले. सहायक गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांनी आभार मानले.

चौकट

पंचायत समितीत घराची प्रतिकृती

पंचायत समिती कार्यालय आवारात घरकुल योजनेतील घराची प्रतिकृती उभारण्यात येणार असून त्या जागेचे भूमिपूजन आमदार दीपक चव्हाण, संजीवराजे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.