शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

मला मिळालेला पुरस्कार जनतेचा अन् कर्मचाऱ्यांचा : मनोज जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:22 IST

सातारा : ''महाराष्ट्र शासनाचा मिळालेला गुणवंत अधिकारी पुरस्कार हा केवळ माझा नसून तो खऱ्या अर्थाने प्रशासनाला भरभरून साथ देणाऱ्या ...

सातारा : ''महाराष्ट्र शासनाचा मिळालेला गुणवंत अधिकारी पुरस्कार हा केवळ माझा नसून तो खऱ्या अर्थाने प्रशासनाला भरभरून साथ देणाऱ्या जनतेचा आणि आपल्या कर्तव्यासाठी राबणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तसेच आजवरच्या प्रशासकीय कारकिर्दीतील सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व वरिष्ठ अधिकारी आणि माझ्या सहकारी अधिकारी बंधूंचा आहे,'' असे मत जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी व्यक्त केले.

सातारा जिल्हा परिषदेमध्ये गुणवंत अधिकारी पुरस्कार मिळाल्यानंतर जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव म्हणाले, ''कोणत्याही क्षेत्रातील उच्च कामगिरी एकट्याने शक्य नाही. जिल्हा परिषदेत काम करीत असताना आतापर्यंतचे सर्वच वरिष्ठांचे उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले. त्यांचा मी ऋणी आहे. विविध पातळ्यांवर सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य केले. वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन केले गेले. अधिकारी मित्रांनीसुद्धा वेळोवेळी कौतुक केले आणि सहकार्यही केले. या सर्वांमुळे महाराष्ट्र शासनाचा मानाचा महत्त्वाचा समजला जाणारा गुणवंत अधिकारी पुरस्कार प्राप्त झाला. या सर्वांबरोबरच आई-वडिलांचे आशीर्वाद आणि कुटुंबियांची मोलाची साथ खूप महत्त्वाची ठरली आहे. त्यांचा देखील मी ऋणी आहे.

माझ्या सोबतच जिल्हा परिषदेतील एक गुणवान कर्मचारी अवधूत वेल्हाळ यांनादेखील गुणवंत कर्मचारी पुरस्कार मिळाला. त्यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे, असेही उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांनी स्पष्ट केले.

फोटो २३सातारा झेडपी नावाने...

फोटोसह घ्यावी, ही विनंती...

फोटो ओळ : सातारा जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अविनाश फडतरे, किरण सायमोते, विनायक पवार आदी उपस्थित होते.

.........................................................................