शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात थंडी परतली; ढगाळ वातावरण निवळले, किमान तापमान २२ अंशावर पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 13:09 IST

सातारा : जिल्ह्यातील ढगाळ वातावरण हळूहळू निवळू लागल्याने किमान तापमानात उतार येत चालला आहे. गुरूवारी सातारा शहरात १९.५ अंशाची ...

सातारा : जिल्ह्यातील ढगाळ वातावरण हळूहळू निवळू लागल्याने किमान तापमानात उतार येत चालला आहे. गुरूवारी सातारा शहरात १९.५ अंशाची नोंद झाली. त्यामुळे थंडी पुन्हा परतू लागली आहे. तर मागील तीन दिवसांपूर्वी किमान तापमान वाढून २२ अंशावर पोहोचले होते.जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापासून थंडीला सुरूवात होते. फेब्रुवारी महिन्यापर्यंत थंडीचा मुक्काम राहतो. त्यातच डिसेंबर महिन्याच्या मध्यानंतर कडाक्याची थंडी पडण्यास सुरूवात होते. जानेवारी महिनाही थंडीतच काढावा लागतो. पण, यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच जिल्हावासीयांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला. १५ नोव्हेंबरपासून थंडीला सुरूवात झाली. हळूहळू किमान तापमानात उतार येत गेला. त्यामुळे सातारा शहराचा पारा ११.८ अंशापर्यंत खाली आला होता.मागील काही वर्षांतील नोव्हेंबर महिन्यातील हे नीच्चांकी तापमान ठरलेले होते. तसेच महाबळेश्वरचा पारा ही १०.५ अंशापर्यंत घसरलेला. यामुळे जिल्ह्यातच थंडीची लाट आल्याचे चित्र होते. कारण, सलग १० दिवस कडाक्याची थंडी असल्याने जनजीवनावर परिणाम झालेला. शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागला होता. पण, मागील पाच दिवसांपासून पारा वाढत गेला.

सातारा शहरवासीयांना मागील काही दिवसांपासून थंडीपासून दिलासा मिळाला. कारण, किमान तापमान वाढून २२ अंशावर गेले होते. त्यातच ढगाळ वातावरण असल्याने थंडी गायब झाल्याचे चित्र हाेते. सध्या ढगाळ वातावरण निवळू लागले आहे. सूर्यदर्शन ही होत आहे. यामुळे पुन्हा किमान तापमानात उतार येत चाललाय. गुरूवारी सातारा शहरात १९.५ अंश किमान तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वरचा पारा ही १७.४ अंश नोंद झाला होता. परिणामी थंडीला पुन्हा सुरूवात होणार असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

सातारा शहरातील किमान तापमान..दि. २५ नोव्हेंबर १२, २६ नोव्हेंबर १२.९, २७ नोव्हेंबर १२, २८ नोव्हेंबर १२.५, २९ नोव्हेंबर १२.२, ३० नोव्हेंबर ११.९, १ डिसेंबर १५, २ डिसेंबर २१.५, ३ डिसेंबर २२.३, ४ डिसेंबर २२.७ आणि दि. ५ डिसेंबर १९.५

टॅग्स :Satara areaसातारा परिसरweatherहवामान