शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

वालचंद-एमटीईत पुन्हा वाद सुरू

By admin | Updated: January 30, 2015 23:36 IST

रखवालदारांना धक्काबुक्की : पोलिसांत तक्रार दाखल

सांगली : येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय व्यवस्थापन व महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी (एमटीई) यांच्यातील जागेचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. एमटीईकडून महाविद्यालयाच्या जागेत नवीन शाळा बांधण्याचा प्रकल्प सुरु असून, यासाठी जागा पाहणी करण्याच्या कारणावरुन दोन्ही गटात वाद झाला. रखवालदारांना धक्काबुक्की झाली. त्यांच्या कार्यालयाची मोडतोड करण्यात आली. काल (गुरुवार) सायंकाळी व आज, शुक्रवार सकाळी सलग दोन दिवस हा प्रकार घडला.एमटीईला नवीन प्राथमिक शाळा सुरु करण्यास मान्यता मिळाली आहे. शाळेची इमारत ते महाविद्यालयाच्या जागेत उभी करणार आहेत. यासाठी एमटीईचे पदाधिकारी, त्यांचे वकील व रखवालदार गुरुवारी सायंकाळी जागेची पाहणी करण्यास गेले होते. त्यावेळी महाविद्यालय व्यवस्थापन समिती व एमटीईत वाद झाला. तसेच एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते. पोलिसांनी दोन्ही गटास बोलावून ‘तुमच्याकडून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य घडल्यास कडक कारवाई केली जाईल’, अशा नोटिसा दिल्या. त्यानंतर आज पुन्हा एमटीईचे पदाधिकारी जागा पाहण्यास गेल्याने तणाव निर्माण झाला होता. या वादात विद्यार्थीही सहभागी झाले होते. महाविद्यालयाचे दोन्ही बाजूचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. व्यवस्थापन समिती व एमटीईचे सुरक्षारक्षक समोरासमोर भिडले. एमटीईच्या सुरक्षा रक्षकांच्या कार्यालयाची मोडतोड करून फलक फाडण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. (प्रतिनिधी)वालचंद महाविद्यालय एमटीईच्या मालकीचे आहे. जागेचा हा जुना वाद आहे. विद्यार्थ्यांनी या वादात पडू नये. नवीन शाळा बांधण्यास मंजुरी मिळाली आहे. त्याचे नियोजन सुरु आहे. महाविद्यालयाची ९० एकर जागा आहे. तिथे शाळा बांधणार आहोत. यास व्यवस्थापन समिती जाणीवपूर्वक विरोध करीत आहे. - प्रा. श्रीराम कानिटकर, सचिव, एमटीई दिवसभर बंदोबस्तमहाविद्यालयासमोर दिवसभर दोन पोलीस व्हॅन ठेवण्यात आल्या होत्या. पन्नासहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले होते. महाविद्यालयात येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येकाची पोलीस चौकशी करीत होते. दोन्ही गटाने पोलिसांत तक्रारी केल्या असल्या तरी, रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा नोंद नव्हता. दरम्यान, महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे कायदेविषयक सल्लागार एन. व्ही. मराठे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.