शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली: पत्नीच्या उपचारावर मोठा खर्च, शेळ्याही गेल्या चोरीला; कर्जाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 12:19 IST

चोरीला गेलेल्या शेळ्या शोधण्यासाठी गेले असता वाटेतच वाहनाला अपघात होवून त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या होत्या

कुरळप : वशी (ता. वाळवा) येथील संजय जयवंत चौगुले (वय ३६) यांनी कर्जाला कंटाळून शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडीस आली. कुरळप पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.काही दिवसांपूर्वी संजय चौगुले यांच्या शेळ्या चोरीला गेल्या होत्या. त्या शेळ्या कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आणल्याचे त्यांना समजले. यामुळे संजय व त्यांची पत्नी हे दोघे वडगाव येथील बाजारात शेळ्या शोधण्यासाठी गेले होते. मात्र, बाजारात शेळ्या सापडल्या नसल्याने दोघेही परत घरी येत होते. वाटेतच त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यात त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या होत्या. पत्नीच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च होऊनही त्या अद्याप बऱ्या झाल्या नाहीत. पत्नीच्या उपचारासाठी चौगुले यांनी कर्जही काढले होते. यामुळे ते निराश होते.सोमवारी सकाळी ते शेतात गेले होते. बराच वेळ ते घरी न आल्याने दहाच्या सुमारास घरच्यांनी शेतात जाऊन पाहिले असता, चौगुले यांनी गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले. यानंतर कुरळप पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पोलीस उपनिरीक्षक घस्ते, अनिल पाटील पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस