शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मिरजेत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा संशयास्पद मृत्यू, कारमध्ये आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 13:59 IST

मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी शोध घेतल्यानंतर पंढरपूर रस्त्यावरील तानंग फाटा परिसरात डांगे हे त्यांच्या कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले

मिरज : मिरजेत पोलिस उपअधीक्षक कार्यालयातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाळू मुसा डांगे (वय ५५, मूळ रा. आरळा, ता. शिराळा, सध्या रा. सांगली) यांचा मिरजेत तानंग फाट्याजवळ संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. त्यांचा मृतदेह कारमध्ये आढळून आला असून नेमका मृत्यू कोणत्या कारणाने झाला याबाबत रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नाही.

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कार्यरत बाळू डांगे पोलिस उपअधीक्षक कार्यालयात प्रतिनियुक्तीवर काम पाहत होते. शुक्रवारी दुपारपासून ते पोलिस सहकाऱ्यांचे व कुटुंबीयांचे फोन उचलत नसल्याने त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी शोध घेतल्यानंतर पंढरपूर रस्त्यावरील तानंग फाटा परिसरात डांगे हे त्यांच्या कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे, पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, मिरज शहर पोलिस निरीक्षक किरण चौगुले, गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल झाले. डांगे यांच्या अकस्मात मृत्यूमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Assistant Police Inspector Found Dead in Car in Miraj

Web Summary : Assistant Police Inspector Balu Dange found dead in his car near Miraj. Colleagues searched after he became unreachable. He was found unconscious and declared dead at a hospital. The cause of death is currently unknown, pending autopsy results.