शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

वाटेगावच्या तुतारीचा आवाज सातासमुद्रापार

By admin | Updated: September 15, 2014 23:13 IST

कलारंग सोहळा : अमेरिकेतील कार्यक्रमात तिघे वादक होणार सहभागी

वाटेगाव : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे शिकागो (अमेरिका) येथे होणाऱ्या कलारंग सोहळ्यामध्ये वाटेगाव (ता. वाळवा) येथील तुतारी (शिंग) वादक आनंदा विष्णू कुंभार, पांडुरंग शंकर गुरव व चंद्रकांत बी. साठे हे सहभागी होऊन महाराष्ट्राच्या लोककलेचे सादरीकरण करणार आहेत. सुमारे ४ लाख प्रेक्षकांसमोर तुतारी वादनाचा कार्यक्रम होणार आहे. प्रसिध्द पार्श्वगायक शंकर महादेवन यांची यावेळी उपस्थिती असणार आहे.बुधवार, दि. १७ सप्टेंबर रोजी शिकागो येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे कलारंग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी वाटेगावच्या या तुतारीवादकांना आमंत्रित करण्यात आले आहे. पांडुरंग गुरव यांनी वडिलांकडून तुतारी वादनाची कला अवगत केली आहे, तर आनंदा कुंभार व चंद्रकांत साठे यांनी पांडुरंग गुरव यांना गुरू मानून त्यांच्याकडून ही कला शिकली आहे. या तिन्ही कलावंतांचे मूळ गाव वाटेगाव असून, पांडुरंग गुरव व आनंदा कुंभार तुतारी वादनाचा छंद जोपासतानाच खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत.प्रतिकूल परिस्थिती या तिघांनी महाराष्ट्राची शान असणारे रणवाद्य तुतारी वाजवण्याची कला जोपासण्याचे काम केले आहे. याची दखल घेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने त्यांची निवड केली आहे. गुरव व कुंभार यांनी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आदींसमोर आपली तुतारी वादनाची कला सादर केली आहे. तसेच मुंबई येथील विविध शासकीय कार्यक्रमांवेळी त्यांना तुतारी वादनासाठी आमंत्रित केले जाते.दरम्यान, हे तिघेही कलावंत कोल्हापुरी फेटा बांधण्यात माहीर असून, ते शिकागो येथे याचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. (वार्ताहर)