सांगली हादरली! किरकोळ वादातून पतीने डोक्यात रॉड घालून पत्नीची केली हत्या; मुलाला मित्राकडे सोडून पती फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 16:03 IST2026-04-14T15:55:21+5:302026-04-14T16:03:34+5:30

ही घटना मंगळवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास विटा येथील सुतारकी येथे घडली.

Sangli shocked Husband kills wife by putting a rod in her head over a minor dispute; Husband absconds, leaving child with friend | सांगली हादरली! किरकोळ वादातून पतीने डोक्यात रॉड घालून पत्नीची केली हत्या; मुलाला मित्राकडे सोडून पती फरार

सांगली हादरली! किरकोळ वादातून पतीने डोक्यात रॉड घालून पत्नीची केली हत्या; मुलाला मित्राकडे सोडून पती फरार

विटा : घरात झालेल्या किरकोळ वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून निघृण खून केल्याची घटना विटा येथील नेवरी रस्त्यावर मंगळवारी सकाळी उघडकीस आली. काजल अविनाश लोटके (वय २५, रा. नेवरी रोड, सुतारकी, विटा) असे या हल्ल्यात मृत झालेल्या दुर्दैवी पत्नीचे नाव आहे. या घटनेनंतर संशयित पती अविनाश तुकाराम लोटके (वय २७) याने त्याच्या तीन वर्षाच्या लहान मुलाला मित्राच्या घरी सोडून पलायन केले. ही घटना मंगळवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास विटा येथील सुतारकी येथे घडली.

Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विटा येथील संशयित पती अविनाश लोटके हा शहरातील एका गॅस एजन्सीकडे सिलेंडर घरपोच देण्याचे काम करतो. अविनाश याचा दिपाली साठे यांची भाची काजल हिच्याशी गेल्या चार ते पाच वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. काजल हिची आई मुंबईत वास्तव्यास असते. त्यामुळे काजल ही विट्यात तिची मावशी दिपाली शशिकांत साठे यांच्याकडे लहानपणापासून राहत होती. लग्नानंतर अविनाश व काजल हे दोघेही त्यांच्या तीन वर्षाच्या मुलासह नेवरी रस्त्यावरील सुतारकी परिसरात एका भाड्याच्या खोलीत राहत होते.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित पती अविनाश व पत्नी काजल यांना तीन वर्षाचा लहान मुलगा आहे. सोमवारी रात्री अविनाश व काजल हे दोघेही यात्रेत फिरायला गेले होते. घरी परत आल्यानंतर या पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी मधरात्री अविनाश याने पत्नी काजल हिच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केला.

या हल्ल्यात काजल ही गंभीर जखमी झाली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर संशयित पती अविनाश याने त्याच्या तीन वर्षाच्या मुलाला पहाटे चार वाजता त्याच्या रोहित कोरडे नामक मित्राकडे सोडून अविनाश याने पलायन केले. सकाळी उशिरापर्यंत अविनाश मुलाला घ्यायला आला नसल्याने मित्र कोरडे याने थेट अविनाशचे घर गाठले.

त्यावेळी खिडकीतून आत पाहिले असता काजल ही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्याने तातडीने घर मालक गाडे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर गाडे यांनी विटा पोलीसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. या घटनेनंतर संशयित पती अविनाश हा फरार झाल्याने पोलीस पथक त्याचा शोध घेत आहे. काजल हिची मावशी दिपाली साठे यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सलग दुसऱ्या दिवशीही हत्या

कार्वे येथे बोअरवेल काम करणाऱ्या परप्रांतीय तरूणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना ताजी असतानाच विटा येथील नेवरी रस्त्यावर काजल लोटके हिचा पतीकडून निघृण केल्याची घटना उघडकीस आली. सलग दोन दिवसापासून तालुक्यात खूनाचे सत्र सुरू असल्याने जनतेत खळबळ उडाली आहे.

Web Title : सांगली में सनसनी: मामूली विवाद में पति ने पत्नी की रॉड से हत्या की।

Web Summary : सांगली के विटा में मामूली कहासुनी के बाद एक पति ने लोहे की रॉड से अपनी पत्नी की हत्या कर दी। उसने अपने बच्चे को एक दोस्त के पास छोड़ दिया और भाग गया। पुलिस जांच कर रही है। पीड़िता काजल लोटके, 25 वर्ष की है। इलाके में दो दिनों में यह दूसरी हत्या है।

Web Title : Sangli Shaken: Husband Murders Wife with Rod over Petty Dispute.

Web Summary : In Vita, Sangli, a husband murdered his wife with an iron rod following a minor argument. He left their child with a friend and fled. Police are investigating. The victim is Kajal Lotke, 25. This marks the second murder in the area in two days.