शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election Results 2026: मिरजेत भाजपचे संख्याबळ घटले; राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पदरात मोठे यश, शिंदेसेनेने खाते उघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 19:44 IST

मिरज : महापालिका निवडणुकीत मिरजेत यंदा राजकीय चित्र बदलले असून, भाजपचे संख्याबळ घटले आहे. प्रथमच निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रवादीने ( ...

मिरज : महापालिका निवडणुकीत मिरजेत यंदा राजकीय चित्र बदलले असून, भाजपचे संख्याबळ घटले आहे. प्रथमच निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रवादीने (अजित पवार) नऊ जागांवर विजय मिळवत चांगली कामगिरी केली. शिंदेसेनेने खाते उघडले, तर राष्ट्रवादीची (शरद पवार) मिरजेत मोठी पीछेहाट झाली आहे.

गत निवडणुकीत भाजपचे १२ सदस्य होते; मात्र यावेळी भाजपला केवळ ९ जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीचे (शरद पवार) पूर्वी ८ सदस्य होते, मात्र यंदा या पक्षाला एकही जागा मिळवता आली नाही. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतील सर्व प्रमुख नेते अजित पवार गेले. याचा थेट फायदा राष्ट्रवादीला (अजित पवार) झाला. राष्ट्रवादीचे (अजित पवार) भाजपइतकेच नऊ सदस्य निवडून आले आहेत. काँग्रेसचे चार सदस्य निवडून आले, प्रभाग तीनमधून शिंदेसेनेचे सागर वनखंडे यांनी पक्षाचे खाते उघडले.

प्रभाग चार व सातमध्ये भाजपचे सर्व आठ उमेदवार विजयी झाले. प्रभाग क्रमांक तीनमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपचा केवळ एकच उमेदवार निवडून आला. येथे भाजपला तीन जागांचा फटका बसला. प्रभाग पाचमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे डॉ. पंकज म्हेत्रे यांनी राष्ट्रवादीच्या करण जामदार यांना चांगली लढत दिली, मात्र भाजपमुळे मतांचे विभाजन झाल्याने सुमारे ३५० मतांनी त्यांचा पराभव झाला. प्रभाग तीनमध्येच राष्ट्रवादीच्या शैला शिवाजी दुर्वे यांनी केवळ दहा मतांच्या फरकाने भाजप उमेदवाराचा पराभव केला.

प्रभाग क्रमांक २०मध्ये आमदार इद्रीस नायकवडी यांचे पुत्र अतहर नायकवडी यांच्यासह राष्ट्रवादीच्या तिन्ही उमेदवारांनी राष्ट्रवादीच्या (शरद पवार) उमेदवारांचा पराभव केला. योगेंद्र थोरात, स्वाती पारधी, मालन हुलवान, दिगंबर जाधव, अभिजित हारगे, अनिता वनखंडे व नर्गिस सय्यद या सात माजी नगरसेवकांना व त्यांच्या कुटुंबीयांना यावेळी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

संजय मेंढे, बबिता मेंढे, करण जामदार, मैनुद्दीन बागवान, गणेश माळी, संदीप आवटी, निरंजन आवटी व अतहर नायकवडी हे आठ सदस्य पुन्हा निवडून आले आहेत. यावेळी मोहन वाटवे, अपर्णा शेटे, विद्या नलवडे, सागर वनखंडे, रेश्मा चौधरी, शिरीन पिरजादे, बिलकीस शेख, अश्विनी कोळी, रेखा कांबळे, उज्ज्वला कांबळे, दयानंद खोत व बानू जमादार हे १३ सदस्य प्रथमच निवडून आले आहेत. यामध्ये सागर वनखंडे हे सर्वांत तरुण नगरसेवक आहेत.

प्रभाग सहामध्ये राष्ट्रवादीने (अजित पवार) उमेदवारी नाकारलेल्या ॲड. बिलकीस शेख यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवून विजय मिळवला. तर प्रभाग तीनमध्ये भाजपने उमेदवारी नाकारलेल्या शिवाजी दुर्वे यांच्या पत्नी शैला दुर्वे या राष्ट्रवादीकडून (अजित पवार) निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादीचे मैनुद्दीन बागवान यांनी सुमारे ६ हजार व काँग्रेसच्या संजय मेंढे-बबिता मेंढे या दाम्पत्याने व भाजपच्या बानू जमादार यांनी सुमारे ५ हजारांच्या फरकाने विजय मिळवला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipal Election 2026: BJP Loses Ground; NCP (Ajit Pawar) Gains.

Web Summary : Miraj saw a shift in power. BJP seats decreased. NCP (Ajit Pawar) gained significantly. Shinde's Sena opened its account. NCP (Sharad Pawar) suffered losses.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे