शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील कारस्थानाचा योग्यवेळी वचपा काढणारच-विश्वजीत कदम

By अविनाश कोळी | Updated: April 25, 2024 20:31 IST

पडद्यामागच्या राजकारणावर काँग्रेस मेळाव्यात संताप

सांगली: लोकसभेसाठी सांगलीत वेगळे राजकारण शिजत असल्याची कल्पना आम्ही वरिष्ठ नेत्यांना दिली होती. तरीही येथील कटकारस्थान यशस्वी करण्यात काही लोक यशस्वी झाले. त्यांच्या या कटाचा वचपा योग्यवेळी काढणारच, असा इशारा काँग्रेसचे नेते आमदार विश्वजीत कदम यांनी गुरुवारी काँग्रेस मेळाव्यात दिला.कदम म्हणाले, जिल्ह्यातील काँग्रेसला गेल्या पंधरा वर्षांत अनेक धक्के बसले. पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख, मदन पाटील, हाफिज धत्तुरे अशा दिग्गज नेत्यांचे निधन झाल्याने पक्षाची जबाबदारी आमच्यासारख्या तरुणांवर पडली. पूर्वी पक्षात याठिकाणी गटबाजी दिसून येत होती. मात्र, आम्ही गटबाजीला मूठमाती देऊन काँग्रेस एकसंध केली. लोकसभा निवडणुकीसाठीही एकच नाव निश्चित करुन ते पक्षाला पाठविले. हीच गोष्ट काहींना सहन झाली नाही. त्यांनी काँग्रेसच्या एकीला दृष्ट लावली. लवकरच आम्ही त्यांची ही दृष्ट उतरवू.

गेल्या एक वर्षापासून सांगली लोकसभा मतदारसंघात राजकारण शिजत होते. त्याची कल्पनाही आम्ही वरिष्ठांना दिली होती. तरीही कोण काय करीत आहे, यावर बारीक लक्ष का ठेवले गेले नाही, हा सवाल आम्हाला सतावत आहे. आम्ही पोटतिडकीने या जागेसाठी संघर्ष केला. दुसऱ्यांसाठी इतका संघर्ष का करीत आहात, असा सवाल मला काहींनी केला होता, पण माझा लढा पक्षाच्या अस्तित्वासाठी होता. त्यामुळे राज्यातील तसेच देशातील नेत्यांचा वाईटपणा मी घेतला. या काळात मी प्रचंड तणावात होतो. देशहितासाठी आघाडीसोबत राहण्याचे पक्षाचे आदेश आहेत. त्याचे पालन आमच्याकडून केले जाईल.चौकट

पतंगरावांचे अन् माझेही गुण आहेतपतंगराव कदम स्पष्ट स्वभावाचे हाेते. वादळात दिवा लावायची त्यांना सवय होती. त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नसल्याचे सांगितले जाते. माझ्यातही त्यांचे गुण आहेत, पण माझे स्वत:चेही काही गुण आहेत. त्यामुळे ज्या लोकांनी आमच्या बाबतीत चुकीचे राजकारण केले त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sangliसांगलीcongressकाँग्रेस