शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
3
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
4
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
5
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
6
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
7
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
8
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
11
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
12
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
13
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
14
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
15
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
17
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
18
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
19
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
20
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत ‘शरीरसौष्ठव’ची केमिस्ट्री बिघडली

By admin | Updated: December 4, 2014 23:49 IST

खेळाडूंची फरफट : संघटनांमधील सत्तासंघर्ष, वशिलेबाजी, वर्चस्ववादामुळे खेळाला फटका

आदित्यराज घोरपडे -हरिपूर -‘शरीरसौष्ठव’ म्हणजे सांगलीचा श्वास. समांतर संघटनांचे राजकारण, सत्तासंघर्ष, वशिलेबाजी आणि वर्चस्ववादामुळे खेळाडूंची फरफट होत आहे. खेळातील राजकारणास कंटाळून काही खेळाडूंनी खेळास ‘रामराम’ ठोकला, तर काहीजण इतर जिल्ह्यातून खेळण्याच्या वाटेवर आहेत. जिल्ह्यातील शरीरसौष्ठवची केमिस्ट्री बिघडल्यानं ‘केमिकल लोचा’ झाला आहे. त्यामुळे सांगली जिल्हा बॅकफूटवर फेकला गेला आहे.
टॉप टू बॉटम सुपर पोझेस देऊन आपल्या पिळदार शरीरयष्टीनं महाराष्ट्राला भूरळ घालणारे अनेक शरीरसौष्ठवपटू सांगलीच्या मातीनं घडवले. मात्र गेल्या वर्षभरात सांगलीच्या शरीरसौष्ठवची केमिस्ट्रीचं बिघडली. जिल्ह्यात दोन समांतर शरीरसौष्ठव संघटना काम करत आहेत. त्यामुळे खेळाडूंची विभागणी झाली. अर्थात राज्यातही हिच स्थिती आहे. ‘आमचीच संघटना अधिकृत व मान्यताप्राप्त’ असा दावा दोन्ही संघटनांकडून केला जातोय. त्यामुळे खेळाडूंची चांगलीच पंचाईत झाली आहे.
सांगलीतील गुणवंत खेळाडू खेळातील राजकारणात भरडले जात आहेत. त्यातीलच एक ‘भगीरथ शाम राठोड’... शरीरसौष्ठवमधील डझनभर मानाच्या किताबाचा मानकरी. सांगलीचा आघाडीचा शरीरसौष्ठवपटू. स्वभाव सडेतोड, मात्र दिलाचा राजा माणूस.
दिवसरात्र मेहनत करूनही भगीरथच्या नशिबी उपेक्षाच. शरीरसौष्ठवमध्ये जेवढ्या वेगाने भगीरथचा ‘सेन्सेक्स’ वर गेला तेवढ्याच वेगाने तो खालीही आला. निराश न होता प्रस्थापितांच्या टीका टोमण्यांचे ‘सप्लीमेंट’ पचवत भगीरथ मेहनत करत राहिला. आता तर ‘महाराष्ट्र श्री’ किताबाला गवसणी घालण्याचं बळ भगीरथनं एकवटलं आहे. रस्त्यावर मसाला विकून उदरनिर्वाह करणारी आई आणि बालपणीच हरपलेले पितृछत्र ही भगीरथची ‘फॅमिली बॅगराऊंड’. सर्टिफाईड ट्रेनर आणि स्पोर्टस् जनरल न्युट्रीशियन्स म्हणून काम करून भगीरथ आपली रोजीरोटी कमावतोय. शरीरसौष्ठवला ‘देव’ मानणाऱ्या भगीरथवर ‘देवा तुला शोधू कुठे’ म्हणण्याची वेळ आली आहे. स्पर्धांमधील वशिलेबाजीमुळे जिल्ह्याचा हा गुणी खेळाडू इतर जिल्ह्यांकडून स्पर्धा खेळण्याच्या वाटेवर आहे.
ही तर भगीरथची शॉर्ट स्टोरी आहे. असे अनेक भगीरथ सांगलीच्या मातीत लपले आहेत.
अन्यायाला कंटाळून काहींनी खेळ सोडला, तर काहीजण खासगी व्यायामशाळेत चार-पाच हजारांवर राबत आहेत. १९९५ नंतर जिल्ह्याला एकदाही ‘महाराष्ट्र श्री’ किताब मिळाला नाही. खेळाडूंची पात्रता असूनही तो का मिळत नाही? की मिळूच दिला जात नाही? याचं शरीरसौष्ठवचे ‘तारणहार’ म्हणवणाऱ्यांना काहीच देणं-घेणं नाही. स्पर्धांचा सर्रास प्रसिध्दीसाठी वापर होत आहे. हीच स्थिती कायम राहिली, तर जिल्ह्यातील शरीरसौष्ठव खेळ संपायला वेळ लागणार नाही.


भगीरथनं मिळवलेले किताब...
भीमसेन सँण्डो श्री, सांगली श्री, पेठभाग श्री, बालगणेश श्री, आरग सरपंच श्री, बेडग सरपंच श्री, अंबाबाई श्री, बिसूर श्री, भिलवडी श्री, जयहिंद श्री, तारदाळ श्री, इस्लामपूर श्री
‘लोकमत’ आयोजित राज्यस्तरीय जवाहरलाल दर्डा श्री स्पर्धा (यवतमाळ) : रौप्यपदक
महाराष्ट्र श्री स्पर्धा (पिंपचरी-चिंचवड) : ७० किलो वजनी गटात कास्यपदक
ज्युनिअर भारत श्री स्पर्धा, खम्माम (हैदराबाद) : ७० किलोत सुवर्णपदक
राष्ट्रीय स्पर्धा, गोकाक (कर्नाटक) : महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व



मी खरे बोलतो, सडेतोड बोलतो म्हणूनच मला अनेकांचा रोष ओढावून घ्यावा लागला. दिवसभर डोक्यात फक्त शरीरसौष्ठवच असते. संघटनांमधील वादामुळे खुप नुकसान झाले. डोक्यावर अडीच लाखाचे कर्ज आहे. जो तो स्वत:चा स्वार्थ बघतो. खुप मेहनत करतोय तरीही खेळातील राजकारणामुळे पाय ओढले जातात. पात्रता असूनही स्पर्धेत खेळू शकत नाही.
- भगीरथ राठोड , (राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू)