Sangli Crime News: ईश्वरपूरमध्ये गरोदर महिलेवर बलात्कार, तरुणासह एका महिलेवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 12:28 IST2026-05-15T12:26:23+5:302026-05-15T12:28:24+5:30

पीडित गरोदर महिला ही मागील महिन्यात ईश्वरपूर शहरातील नातलग असणाऱ्या संशयित महिलेकडे राहण्यासाठी आली होती

Pregnant woman raped in Ishwarpur Sangli police register case against a woman along with a young man | Sangli Crime News: ईश्वरपूरमध्ये गरोदर महिलेवर बलात्कार, तरुणासह एका महिलेवर गुन्हा

संग्रहीत छाया

ईश्वरपूर : ईश्वरपूर शहरात नातेवाईकांकडे राहण्यासाठी आलेल्या ८ महिन्यांची गर्भवती महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार मागील महिन्यात २२ ते २७ एप्रिल या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत २० वर्षीय पीडित महिलेने हातकणंगले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा अधिक तपासासाठी ईश्वरपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार स्वप्नील देवकर (वय ३०) आणि मेघा विजय वाघमारे (दोघेही राहणार ईश्वरपूर) यांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवला गेला आहे. गुन्हा दाखल होताच दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी दोघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : पीडित गरोदर महिला ही मागील महिन्यात ईश्वरपूर शहरातील नातलग असणाऱ्या संशयित महिलेकडे राहण्यासाठी आली होती. त्यावेळी महिलेच्या घराशेजारी राहणारा स्वप्नील देवकर याने पीडित महिलेची इच्छा नसतानाही आणि ती आठ महिन्यांची गरोदर आहे हे माहीत असूनही तिच्या इच्छेविरुद्ध जोरजबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला. या घटनेनंतर स्वप्नील देवकर आणि मेघा वाघमारे या दोघांनी हा प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. पोलिस उपनिरीक्षक समाधान घुगे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Pregnant woman raped in Ishwarpur Sangli police register case against a woman along with a young man