शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिकलगारांच्या निर्णयावर पाटलांचे भवितव्य

By admin | Updated: August 24, 2015 23:39 IST

स्थायी सभापती निवड : मदनभाऊंच्या निर्णयाकडे लक्ष; सप्टेंबरमध्ये कार्यक्रम

सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. समितीतील ज्येष्ठ सदस्य हारूण शिकलगार यांचे नाव सध्या आघाडीवर असले तरी, त्यांनी सभापतीपद नाकारल्यास सांगलीवाडीचे दिलीप पाटील व संतोष पाटील यांच्यापैकी एकाची वर्णी लागू शकते. सभापतीपद मदनभाऊनिष्ठ नगरसेवकालाच मिळणार, हे स्पष्ट असून ते कोणाला संधी देतात, याची उत्सुकता लागली आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. नुकतीच समितीच्या आठ सदस्यांची महासभेत निवड करण्यात आली. त्यात काँग्रेसच्या सहा, तर राष्ट्रवादीच्या दोघांचा समावेश आहे. काँग्रेसमध्ये स्थायी सदस्यपदासाठी रस्सीखेच होती. काँग्रेसअंतर्गत मदन पाटील व पतंगराव कदम गटात संघर्ष पेटला होता. या संघर्षात मदन पाटील यांनी बाजी मारत आपल्याच निष्ठावंतांची सदस्यपदी वर्णी लावली. सहापैकी एक जागा पतंगराव समर्थक धोंडुबाई कलकुटगी यांना देण्यात आली. स्थायी समितीत काँग्रेसचे नऊ सदस्य आहेत. त्यापैकी आठ सदस्य मदन पाटील यांचा शब्द मानणारे आहेत. त्यामुळे या आठ सदस्यांपैकीच एकाला सभापतीपद मिळणार, हे स्पष्ट आहे. सध्या समितीतील ज्येष्ठ सदस्य हारूण शिकलगार यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. पण शिकलगार यांनी यापूर्वी दोनदा स्थायीचे सभापतीपद भूषविले आहे. आता ते महापौर पदासाठी इच्छुक आहेत. मदन पाटील यांनी शिकलगार यांना महापौर पदाचा शब्द दिल्यास ते सभापती पदापासून दूर होऊ शकतात. महापौर पदाबाबत अडचण असेल, तर सभापतीपद मिळावे, असा आग्रह शिकलगार यांनी धरल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत मदन पाटील काय निर्णय घेतात, यावरच सभापती पदाचे भवितव्य अवलंबून आहे. शिकलगार यांच्यासह सांगलीवाडीचे दिलीप पाटील, संतोष पाटील यांनीही सभापती पदावर दावा सांगितला आहे. संतोष पाटील हे मदनभाऊंच्या प्रभागातून निवडून आले आहेत, तर दिलीप पाटील यांनी कधी नव्हे ते सांगलीवाडीचा गड सर करून मदनभाऊंची पताका फडकविली आहे. त्यामुळे या दोन पाटलांच्या नावांचा प्रामुख्याने विचार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे इच्छुकांनी आतापासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)