शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election: सांगली जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार ‘कमळ’ अन् ‘घड्याळा’चे; काँग्रेस, उद्धवसेना, तुतारी'चे किती...वाचा

By अशोक डोंबाळे | Updated: November 29, 2025 15:35 IST

कोण बाजी मारणार, याकडे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष

सांगली : जिल्ह्यातील सहा नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीत सर्वाधिक १४१ उमेदवार ‘कमळ’ चिन्हावर, तर १०३ उमेदवार 'घड्याळ' चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. धनुष्यबाण चिन्हावर ७७, तर तुतारी चिन्हावर ५३ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वात कमी काँग्रेसने ४२, तर उद्धवसेनेने केवळ नऊ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. या कंबरदणातील लक्षवेधी नगरपालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकांवरच सर्व पक्षांच्या नेत्यांचे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुकीतील भविष्य अवलंबून आहे.

राज्य आणि केंद्रात महायुती आणि महाविकास आघाडी आहे; परंतु नगरपालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत तणावाचे चित्र दिसते. जिल्ह्यातील उरुण-ईश्वरपूर, आष्टा, पलूस, तासगाव, विटा, जत या सहा नगरपरिषदा आणि शिराळा, आटपाडी नगरपंचायतींच्या निवडणुकीत सर्व पक्षांनी प्रतिष्ठेची लढत केली आहे. प्रत्येक पक्षाचा नेता नंबर एक होण्यासाठी कंबर कसून उभा ठाकला आहे. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा बालेकिल्ला अशी जिल्ह्याची ओळख होती, मात्र काँग्रेस आता केवळ पलूस आणि जत या दोन ठिकाणीच आपल्या चिन्हावर लढत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी उरुण-ईश्वरपूरमध्ये तुतारी चिन्हावर उमेदवार उभे केले आहेत, तर त्याच मतदारसंघातील आष्टा नगरपालिकेसाठी आष्टा शहर विकास आघाडी नेत्यांनी उमेदवार दिले आहेत. जिल्ह्यातील आठ नगरपालिकांमध्ये तुतारी चिन्हावर केवळ ५३ उमेदवार रिंगणात आहेत. शिंदेसेनेकडून चार नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी आणि नगरसेवकपदांसाठी एकूण ७७ उमेदवार रिंगणात उतरवले गेले आहेत.

शिंदेसेनेकडून जत, तासगाव, पलूस, विटा आणि आटपाडी या नगरपालिकांमध्ये महायुतीविरोधात दंड थोपटले आहे. सांगली-लोकसभा निवडणूक मैदानात उतरविणाऱ्या उद्धवसेनेकडून पलूस नगराध्यक्षपदासाठी तसेच पाच उमेदवार आणि तासगाव नगरपालिकेसाठी पाच उमेदवार असे एकूण १० उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील नाराज नेत्यांची मोठी बांधणी करून एकूण १०३ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. अजित पवारांच्या घड्याळाला शिराळ्यात जिल्हा बँक अध्यक्ष मानसिंगराव नाईक आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा पाठिंबा मिळत आहे. जतमध्ये माजी आमदार विलासराव जगताप यांनी तुतारीचे नेते सुरेश शिंदे यांच्या हातात घड्याळ बांधून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उभा केला आहे.

आठ पालिकांतील पक्षनिहाय नगरसेवकपदांसाठी उमेदवार संख्या

  • भाजप : १४१
  • राष्ट्रवादी काँग्रेस : १०३
  • काँग्रेस : ४२
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष : ५३
  • शिंदेसेना : ७७
  • उद्धवसेना : ९


सहा ठिकाणी भाजपच्या उमेदवारांची लढत

सहा पालिकांमध्ये नगराध्यक्षपदांसाठी भाजप, राष्ट्रवादीचे उमेदवारसहा नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या आठ जागांपैकी उरुण-ईश्वरपूर, पलूस, विटा, तासगाव, आटपाडी, जत या सहा ठिकाणी भाजपचे उमेदवार लढत देत आहेत. शिराळा, आष्टा, पलूस, जत, विटा, तासगाव या सहा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर उमेदवार उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि काँग्रेस यांनी प्रत्येकी दोन ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिले आहेत. शिंदेसेना विटा, आटपाडी, शिराळा, जत या ठिकाणी, तर उद्धवसेनेने तासगाव येथे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Local Body Elections: BJP, NCP lead; Congress, Uddhav Sena trail.

Web Summary : Sangli's local elections see BJP and NCP with the most candidates. Congress and Uddhav Sena have fewer. All eyes are on the results as they impact future elections.