शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचं ठरलं..; अध्यक्ष, उपाध्यक्षपदासह सभापतीपदाचे उमेदवार निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 19:22 IST

अजित पवार गटाला तूर्त अध्यक्षपद नाहीच; भाजपसह मित्रपक्षांचे १८ सदस्यही कोल्हापूरला

सांगली : जिल्हा परिषदेत बुधवारी (दि. १८) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने सत्तास्थापनेची तयारी केली असून अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापतिपदांसाठीही नावे निश्चित झाल्याची माहिती आहे. अध्यक्षपदावर हक्क सांगणाऱ्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला तूर्त वेटिंगवर राहावे लागणार आहे, तर मतदानावेळी शिंदेसेनेचे सदस्य तटस्थ राहण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, भाजपसह मित्रपक्षांचे सदस्यही सोमवारी कोल्हापूरला रवाना झाले. त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जनसुराज्यचे नेते समित कदम व अन्य नेते आहेत.

निवडीची प्रक्रिया अवघ्या एका दिवसावर आल्याच्या स्थितीत मंगळवारी आघाडीच्या नेत्यांची सांगलीत बैठक होणार आहे. त्यामध्ये निवडीची प्रक्रिया, मतदान, व्हीप काढणे आदी प्रक्रियेवर चर्चा होईल. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतिपदांची नावे जवळजवळ निश्चित झाली आहेत, त्यामुळे उद्याची बैठक ही औपचारिक स्वरूपाची असेल. अर्थात, भाजपच्या संभाव्य डावपेचांचा बैठकीत अंदाज घेतला जाणार आहे. मंगळवारीच भाजपसह सर्व पक्षांचे व्हीप जारी होणार आहेत. आघाडीच्या अज्ञातस्थळी असलेल्या सदस्यांपर्यंत ते पोहोचविले जातील. तेथेच त्यांना मतदान प्रक्रियेची माहिती दिली जाईल.

..असे आहेत संभाव्य पदाधिकारी

अध्यक्ष - संगीता पाटील, कासेगाव (राष्ट्रवादी कॉंग्रेस, शरद पवार)
उपाध्यक्ष - ऋषिकेश लाड (काँग्रेस)
सभापती - विनायक मासाळ, सावित्री तम्मनगौडा रवी-पाटील, स्नेहल मोरे (सर्व राष्ट्रवादी अजित पवार), अभिजित पाटील (उद्धवसेना).

शिंदेसेना तटस्थ राहणार?

सात सदस्यसंख्या असणारी शिंदेसेना प्रत्यक्ष मतदानावेळी तटस्थ राहण्याची शक्यता आहे. पक्षाचे नेते आमदार सुहास बाबर आणि तानाजी पाटील यांनी भाजपला पाठिंबा देण्याबाबत नकारात्मक सूर कायम ठेवला आहे. ‘निवडणूक काळात भाजप आमदाराकडून झालेला त्रास कसा विसरणार’, असा खडा सवाल त्यांनी पालकमंत्र्यांना विचारला आहे. तथापि, राज्यातील सत्तेची गणिते सांभाळण्यासाठी मुंबईतील पक्षनेते सांगलीत भाजपला पाठिंबा देण्याच्या भूमिकेत आहेत. या स्थितीत शिंदेसेना तटस्थ राहण्याच्या मानसिकतेत आहे. ‘भाजपला पाठिंबा दिला नाही, तरी विरोधही केला नाही’ ही बचावात्मक भूमिका अवलंबली जाऊ शकते. तथापि, पक्षाच्या दोघा सदस्यांनी मात्र थेट आघाडीला पाठिंब्याचा निर्णय घेतला आहे.

अजित पवार गट तूर्त वेटिंगवरच

आम्हाला पहिली सव्वा वर्ष अध्यक्षपद हवे आहे. ते देईल त्याच पक्षाला आमचा पाठिंबा असेल अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी (अजित पवार) गेल्या महिन्याभरापासून घेतली होती. आता प्रत्यक्ष पक्षनेत्यांनी संयमाची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. पहिले अध्यक्षपद शरद पवार गटाला देण्यात येणार आहे. त्यानंतर सव्वा वर्षांनी अजित पवार गटाला संधी मिळेल, असे ठरल्याचे सांगण्यात आले. अर्थात, याची भरपाई करताना पक्षाला सभापतिपदांवर मात्र संधी मिळणार आहे. आघाडीला पाठिंबा देणारे उद्धवसेनेचे एकमेव सदस्य अभिजित पाटील यांनाही सभापतिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

भाजपच्या १६ सदस्यांसह जनसुराज्य व रयत क्रांती पक्षाचे मिळून १८ सदस्य कोल्हापुरात आहेत. तेथे स्नेहभोजनासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमचा कोणी सदस्य फुटेल किंवा पळून जाईल यासाठी सांगलीबाहेर आलेलो नाही. आमचे सर्व सदस्य एकगठ्ठा आहेत. - सम्राट महाडिक, जिल्हाध्यक्ष, भाजप

English
हिंदी सारांश
Web Title : Maha Vikas Aghadi seals Sangli Zilla Parishad deal: Candidates finalized.

Web Summary : Sangli Zilla Parishad's president, vice-president, and committee chairpersons are likely to be from Maha Vikas Aghadi. Despite initial demands, NCP's Ajit Pawar faction is on hold, with Sharad Pawar's group getting the first term. Shinde Sena may abstain from voting.