मिरज : मिरज-पंढरपूर रस्त्यावर तासगाव फाट्याजवळ कंटेनरला आणि दुचाकीच्या अपघातातकोल्हापूर येथील पोलिस हवालदाराच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातातपोलिस हवालदार असलेले वडील जखमी झाले आहेत.
हरिप्रसाद संताजी चव्हाण (वय १८, रा.कोल्हापूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे वडील पोलिस हवालदार संताजी शीलवंत चव्हाण (वय ४९) हे जखमी झाले. कोल्हापूर पोलिस दलात कार्यरत असलेले संताजी चव्हाण हे मुलगा हरिप्रसाद याला नीट परीक्षा देण्यासाठी सोलापूर येथे घेऊन गेले होते.
परीक्षा झाल्यानंतर काही दिवस सोलापुरात थांबल्यानंतर ते दोघेही गुरुवारी कोल्हापूरकडे त्यांच्या दुचाकी (क्र.एमएच ०९, बीडब्ल्यू २६०९)वरून गुरुवारी परतत होते. रात्री दहा वाजता मिरजेजवळ तासगाव फाटा परिसरातील मरुधर ढाब्यासमोर आल्यानंतर एक कंटेनर (क्र.पीबी ०६ पीडब्ल्यू ९८८३) अचानक ढाब्याच्या दिशेने वळला. त्यामुळे दुचाकीची कंटेनरला जोरदार धडक बसली.
या अपघातात हरिप्रसाद गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या अपघातात संताजी चव्हाण हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुटुंबीयांना धक्का
वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पाहात परीक्षा दिलेल्या तरुण मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने चव्हाण कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. जखमी पोलिस संताजी यांना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Web Summary : A Kolhapur policeman's son, Hariprasad Chavan, died in a road accident near Miraj while returning from his NEET exam in Solapur. His father, a police constable, was injured when their bike collided with a container. A case has been filed against the container driver.
Web Summary : सोलापुर में नीट परीक्षा देकर लौट रहे कोल्हापुर के एक पुलिसकर्मी के बेटे हरिप्रसाद चव्हाण की मिरज के पास सड़क दुर्घटना में मौत हो गई। उनके पिता, जो एक पुलिस कांस्टेबल हैं, घायल हो गए जब उनकी बाइक एक कंटेनर से टकरा गई। कंटेनर चालक के खिलाफ मामला दर्ज किया गया है।