शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: शिराळ्यात राजकीय पक्षापेक्षा गटनेत्यांच्या अस्तित्वाची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 19:27 IST

माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या भूमिकेचे राजकीय गणित आजही कोणाला कळले नाही

अशोक पाटीलइस्लामपूर : शिराळा मतदारसंघात पारंपरिक तीन गट आहेत. त्यातच आता महाडिक गटाची भर पडली आहे. नव्याने निर्माण झालेल्या अजित पवार गटात माजी मंत्री शिवाजीराव नाईक दाखल झाले. त्यामुळे मतदारसंघात पाच स्वयंभू नेते पक्षीय पातळीवर कार्यरत असले, तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गटनेत्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकणार आहे. निवडणुकीत अंतिम टप्प्यात मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत आहेत.शिराळा मतदारसंघात माजी मंत्री शिवाजीराव नाईक, मानसिंगराव नाईक आणि आता नव्याने झालेले आमदार सत्यजीत देशमुख असे तीन पारंपरिक गट आहेत. त्यातच आमदार सत्यजीत देशमुख यांनी महाडिक गटाशी जुळवून घेत आमदार पदाला गवसणी घातली आहे. परंतु, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षवाढीपेक्षा स्वत:च्या गटाचे अस्तित्व टिकवण्यासाठी नेते प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर मतदारसंघातील राजकारण वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता आहे.माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या भूमिकेचे राजकीय गणित आजही कोणाला कळले नाही. मुंबईत गेले की, अजित पवार गट, मतदारसंघात आले की, आमदार जयंत पाटील यांच्या गटाबरोबर राहून राजकीय सूत्रे हलविण्याचा फंडा विधानसभा निवडणुकीत मोडीत निघाला. त्यामुळेच सध्यातरी उद्योग क्षेत्रात प्रगती करण्याचा डाव माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी आखला आहे.भविष्यातील राजकीय वेध घेऊनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरण्याची खेळी आखली आहे. तर त्यांच्यापासून फारक घेतलेले माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारून स्वत:च्या अस्तिवाचा पाचवा गट निर्माण केला आहे. सध्या नाईक अजित पवार गटाची ताकद वाढविण्यात व्यस्त आहेत.गेल्या विधानसभा निवडणुकीपासून भाजपामध्येच नवीन उदयास आलेला गट म्हणजे राहुल आणि सम्राट महाडिक यांची ताकद आमदार सत्यजीत देशमुख यांच्या कामी आली असली, तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपापेक्षा स्वत:च्या गटाची ताकद दाखवावी लागणार आहे. एकंदरीत शिराळा मतदारसंघात पक्षीय पातळीपेक्षा स्वबळाची ताकद प्रत्येक गटनेत्याला दाखवावी लागणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जवळ आली असली, तरी काही पक्ष किंवा गटांनी आपले राजकीय पत्ते खुले केलेले नाहीत. पारंपरिक तीन गट आजही कार्यरत आहेत. त्यातच आता महाडिक गटाची भर पडल्याने शिराळा मतदारसंघात स्वत:चे नेतृव बळकट करण्याचा प्रयत्न नेत्यांचा राहणार आहे. - माजी आमदार मानसिंगराव नाईक, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

टॅग्स :Sangliसांगलीshirala-acशिराळाPoliticsराजकारणMansingrao Naikमानसिंगराव नाईकSatyajit Deshmukhसत्यजित देशमुखShivajirao Naikशिवाजीराव नाईक