शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

वंदेभारत एक्स्प्रेसचा वाद; सांगलीवर पुन्हा अन्याय, कोल्हापूरला थांबा

By अविनाश कोळी | Updated: September 12, 2024 16:15 IST

खासदारांसह विविध संघटनांचे रेल्वे मंत्र्यांना पत्र

सांगली : हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला कोल्हापुरातून वळसा घालून मार्ग दिल्याने कर्नाटकच्या लोकप्रतिनिधींनी विरोध केला होता. आता कोल्हापूरच्या खासदारांनी तसेच सांगलीच्या संघटनांनीही विरोध दर्शवित दोन स्वतंत्र वंदेभारत देण्याची मागणी केली आहे. एकीकडे कोल्हापूरला हुबळीच्या गाडीचा थांबा नको असताना दिला गेला, तर सांगलीकरांनी मागणी करुनही या गाडीचा तीन दिवसांचा सांगली स्थानकावरील थांबा रद्द केला आहे.रेल्वे मंत्रालयाने पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकला जोडणारी ‘वंदेभारत एक्स्प्रेस’ मंजूर केली आहे. हुबळी ते पुणे (गाडी क्र. २०६६९) व पुणे ते हुबळी (क्र. २०६७०) या दोन गाड्या मिरज, सांगली, सातारामार्गे मंजूर केल्या होत्या. नंतर त्यात कोल्हापूरलाही थांबा दिल्याचे नमूद करण्यात आले. तीन दिवस कोल्हापूरमार्गे व तीन दिवस थेट मिरज, सातारामार्गे गाडी धावेल, असे म्हटले आहे.पुणे ते हुबळी या मार्गावरुन जाताना कोल्हापूरचे स्थानक ४८.५ कि. मी. दूर आहे. आठ तासांच्या कालावधित धावणारी ही गाडी कोल्हापूरमार्गे धावताना १० तास वेळ खाणार आहे. त्यामुळेच कर्नाटक व महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी व संघटनांनी त्यास विरोध केला आहे. कोल्हापूर ते मुंबई मार्गावर स्वतंत्र वंदे भारत मंजूर आहे. तरीही कोल्हापूरचा यात समावेश करुन मंजूर गाडी रद्दचा डाव असल्याचा संशय प्रवाशांमधून व्यक्त केला जात आहे.

सांगलीवर पुन्हा अन्यायवंदेभारतला सांगली रेल्वे स्थानकावर थांबा दिल्याची माहिती जेव्हा भाजपच्या नेत्यांनी दिली तेव्हा सांगलीकर प्रवाशांनी आनंद साजरा केला. पण, अचानक गुरुवारी सांगलीचा तीन दिवसांच्या फेऱ्यात थांबा रद्द केला आहे. त्यामुळे सोशल मिडियावर पुन्हा रेल्वे प्रशासनाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

यांनी केला विरोधहातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह सांगली, मिरज मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन, नागरिक जागृती मंच आदींनी रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांना पत्र पाठवून हुबळीची गाडी कोल्हापूरमार्गे न वळविता मंजूर असलेली कोल्हापूर ते मुंबई वंदेभारत सुरु करावी, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसkolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे