शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ योजनेचे पंधरा पंप अखेर सुरू

By admin | Updated: August 26, 2015 00:26 IST

शेतकऱ्यांना दिलासा : मिरज, कवठेमहांकाळ, जतला फायदा

मिरज : म्हैसाळ योजनेचे पंधरा पंप मंगळवारी सुरू करण्यात आले. खा. संजय पाटील यांनी कळ दाबून पंप सुरू केले. अवर्षणामुळे पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होत असताना म्हैसाळचे पाणी सोडण्यात आल्याने मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.आॅगस्टअखेरपर्यंत पाऊस न पडल्याने म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. टंचाई निधीतून वीजबिलाची तरतूद करून पाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. खा. संजय पाटील यांनी मंगळवारी म्हैसाळ योजनेचे पंप सुरू केले. ताकारी व टेंभू योजना चांगल्या पद्धतीने सुरूआहे. त्याच पद्धतीने म्हैसाळ योजना चालविण्याची जबाबदारी या परिसरातील साखर कारखाने व मोठ्या शेतकऱ्यांनी घ्यावी, असे पाटील यांनी सांगितले. म्हैसाळ योजनेचा द्राक्षबागायतदारांना मोठा फायदा झाला आहे. मात्र तरीही वीजबिलाएवढी रक्कम जमा होत नाही. जिल्ह्यातील इतर दोन योजना सुरू असताना म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करावे लागतात. म्हैसाळ योजना पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले नाही, तर ही योजना बंद पडेल, अशी भीती पाटील यांनी व्यक्त केली.मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे, दीपक शिंदे, पंचायत समिती सभापती दिलीप बुरसे, बाळासाहेब होनमोरे, गंगाधर तोडकर, कुमार नाईक, मिरजेचे प्रांत हेमंत निकम, म्हैसाळचे उपअभियंता सूर्यकांत नलवडे उपस्थित होते. म्हैसाळचे पहिल्या टप्प्यातील १५ पंप सुरू करण्यात आले असून, दोन महिने जतपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहेत. पुढील आठवड्यात पहिल्या टप्प्यातील आणखी पंप सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे लाभक्षेत्रातील गावात पिण्यासाठी व शेतीसाठी म्हैसाळच्या पाण्याचा फायदा मिळणार आहे. उद्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत पाणी पोहोचणार असून, तीन दिवसांत म्हैसाळ पाणी योजनेचे पाणी कवठेमहांकाळ तालुक्यात पोहोचणार आहे. कॅनॉलसाठी पोलीस संरक्षण देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)वीस कोटींची पाणीपट्टी थकित जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनीही म्हैसाळ योजना सुरू ठेवण्यासाठी थकित पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले. गेल्या आवर्तनाची थकित पाणीपट्टी १५ सप्टेंबरपर्यंत भरावी अन्यथा थकित पाणीपट्टीचा बोजा सातबारावर नोंद करण्यासाठी महसूल विभाग, जलसंपदा विभागाला सहकार्य करणार असल्याचे जिल्हाधिकारी गायकवाड यांनी सांगितले. म्हैसाळ पाणी योजनेचे अधीक्षक अभियंता एस. के. धुमाळ यांनी सुमारे २० कोटी थकित पाणीपट्टी असून, त्यापैकी १० कोटी रुपये वीजबिल असल्याचे त्यांनी सांगितले.