शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे राष्ट्रवादी समर्थकांकडून अपहरण; चाकू, पिस्तुलाच्या धाकाने बेदम मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 16:59 IST

तिघांविरुद्ध गुन्हा

मिरज : शिपूर (ता. मिरज) येथील काँग्रेस कार्यकर्ते रणजीत देसाई यांचे मंगळवारी रात्री गावातील राजकीय वादातून राष्ट्रवादी समर्थकांनी चाकू व पिस्तुलाच्या धाकाने अपहरण केले. यावेळी नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांची सुटका झाली. मारहाणीत देसाई यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिपूर येथील काँग्रेसचे कार्यकर्ते रणजीत लालासाहेब देसाई (वय ४८) हे सांगली येथून मंगळवारी संध्याकाळी सात वाजता शिपूर येथे चालले होते. मिरज ते सलगरे रस्त्यावर पायापाची वाडी बस स्थानकाजवळ त्यांना पाठीमागून मोटारीने धडक देऊन खाली पाडले. देसाई यांना चाकू व पिस्तुलाचा धाक दाखवत तोंडावर रुमाल बांधलेल्या तिघांनी मोटारीत जबरदस्तीने बसवून मोटार व्यंकोची वाडी, आरग, मंगसुळी मार्गाने नेली. मोटारीत मारहाण करून देसाई यांच्या खिशातील पाकीट व त्यातील चार हजार रुपये हिसकावून घेतले. यावेळी प्रसंगावधान राखत रणजीत देसाई यांनी मोटारीच्या एक्सिलेटरमध्ये पाय अडकविल्याने गाडीचा वेग कमी झाला. यावेळी देसाई यांनी ‘वाचवा.. वाचवा..’ असा ओरडा केला. यावेळी मोटार आरग बस स्थानक परिसरात होती. गाडीत काहीतरी गडबड आहे, अशी शंका तेथील नागरिकांना आल्याने त्यांनी गाडीचा पाठलाग केला. मोटार वेगात लक्ष्मीवाडीच्या दिशेने गेल्याने आरगेतील काही जणांनी फोन करून लक्ष्मीवाडी मंगसुळी येथील नागरिकांना याबाबत सूचना दिली. लक्ष्मीवाडी व आरग येथील तरुणांनी गाडीचा पाठलाग केल्याने लक्ष्मीवाडी मंगसुळी हद्दीजवळ मोटार थांबली. रणजीत देसाई यांची सुटका करून दोन हल्लेखोरांनी अंधारात पलायन केले. यावेळी मोटार चालविणारा शिवाजी महाडिक यास देसाई यांनी ओळखले. हल्लेखोरांनी मोटारीत बेदम मारहाण केल्याने देसाई यांच्या डाव्या हाताचे मनगट फॅक्चर झाले आहे. सुटका झाल्यानंतर रणजीत देसाई यांनी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शिवाजी श्रीकांत महाडिक व दोन अनोळखी तरुणांविरोधात ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, मिरज ग्रामीण पोलिस अधिक तपास करीत आहेत.

जखमी खासदार समर्थकरणजित देसाई व शिवाजी महाडिक यांच्यात ग्रामपंचायत निवडणूक वादातून वैमनस्य आहे. यापूर्वीही महाडिक यांनी देसाई यांना पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण केल्या प्रकरणी महाडिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देसाई यांच्या अपहरणाचे वृत्त समजताच खासदार विशाल पाटील यांनी शिपूर येथे रणजित देसाई यांची भेट घेऊन विचारपूस केली.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसCrime Newsगुन्हेगारी