सांगली : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी जुना स्टेशन रोडवरील पेट्रोल पंपाजवळ केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. घोषणाबाजी, आंदोलन आणि केंद्र सरकारविरोधातील संतप्त भाषणांनी परिसर दणाणून गेला.
शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. “आजचे मोदी सरकार महागाई रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. मात्र, जनतेला दिलासा देण्याऐवजी पंतप्रधान विदेश दौरे करत आहेत आणि नागरिकांना ‘तेल कमी वापरा, सोने खरेदी करू नका, गाड्या कमी वापरा, घरातूनच काम करा’ असे उपदेश देत आहेत,” असा घणाघात त्यांनी केला.
काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. सिकंदर जमादार यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला. “गेल्या बारा वर्षांत मोदी सरकारने शिक्षण, आरोग्य आणि शेतकरी हितासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. काँग्रेसने उभ्या केलेल्या शाळा आणि संस्थांना मदत न करता मोठ्या उद्योगपतींना प्राधान्य दिले जात आहे. जून महिना तोंडावर आला तरी शेतकऱ्यांसाठी खतांची उपलब्धता करण्यात सरकार अपयशी ठरले आहे,” अशी टीका त्यांनी केली.
आंदोलनात सांगली बाजार समितीचे माजी सभापती सुभाष खोत, डॉ. प्रमोद इनामदार, अजित ढोले, मयूर पाटील, प्रमोद सूर्यवंशी, नगरसेविका अंजली जाधव, ललितकुमार दबडे, अरुण पळसुले, विक्रम सावर्डेकर, प्रतीक्षा काळे, कांचन खंदारे, मीना शिंदे, शैलेंद्र पिराळे, महेश भंडारे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Web Summary : Sangli Congress protested rising petrol-diesel prices, criticizing the BJP government's failure to control inflation and address farmers' issues. Leaders highlighted rising costs and ineffective policies.
Web Summary : सांगली में कांग्रेस ने पेट्रोल-डीजल की बढ़ती कीमतों का विरोध किया, बीजेपी सरकार की महंगाई को नियंत्रित करने और किसानों के मुद्दों को हल करने में विफलता की आलोचना की। नेताओं ने बढ़ती लागत और अप्रभावी नीतियों पर प्रकाश डाला।