शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

साखराळेत मतदानावेळी महायुती-आघाडीच्या कार्यकर्त्यांत हाणामारी, दोन्ही गटांच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 12:11 IST

जयंत पाटील यांच्या होमपीचवर वाद..

इस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) येथे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना बुथवर अपक्ष उमेदवाराची खोटी सही करून बोगस एजंट बनल्याच्या कारणातून महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मंगळवारी सकाळी बाचाबाची आणि दुपारी हाणामारी झाली. याबाबत मतदान केंद्रावरील पोलिस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून दोन्ही गटांच्या ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.सतीश आनंदा खोत (३२) या पोलिस शिपायांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप पाटोळे, ओंकार देशमुख, स्वप्नील लोहार, दत्तात्रय पाटील, रामराजे पाटील, प्रशांत पाटील, संतोष पाटील, प्रदीप बाबर (सर्व रा. साखराळे, ता. वाळवा) अशा दोन्ही गटांतील आठ कार्यकर्त्यांविरुद्ध भादंवि कलम १६०,१८६,१८८ आणि ३७ (१) (३)/१३५ नुसार गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारच्या सुमारास मतदान केंद्र क्रमांक ६२ आणि ६३ च्या परिसरात घडला.याबाबतची माहिती अशी, साखराळे येथे मतदान प्रक्रिया सुरू असताना संदीप पाटोळे यांनी मतदान केंद्र क्र.६३ चे केंद्राध्यक्ष शंकर यशवंत होनमाने यांच्याकडे अपक्ष उमेदवार रामचंद्र गोविंद सांळुखे यांच्या सहीने प्रतिनिधीकरिता दिलेल्या फॉर्मवरची सही खोटी करून संतोष राजेंद्र पाटील व संतोष विष्णू पाटील (दोन्ही रा. साखराळे) हे मतदान प्रतिनिधी म्हणून मतदान केंद्रावर काम करीत आहेत अशी तक्रार केल्यावर या वादाला तोंड फुटले. त्यातून दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकास भिडले व तिथे हाणामारी झाली.पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करत एकमेकांशी वाद घालत धक्काबुक्की केली असा ठपका ठेवत सरकारतर्फे हा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे अधिक तपास करत आहेत.

जयंत पाटील यांच्या होमपीचवर वाद..राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे आपल्या दोन्ही मुलांसमवेत बुद्धविहार येथील केंद्रावर मतदान करून गेले होते. त्यानंतर या वादाला तोंड फुटले. साखराळेच्या गाव हद्दीतच कारखाना असल्याने येथे त्यांच्या गटाचे नेहमीच प्राबल्य राहिले आहे. त्यामुळे येथे पारंपरिक विरोधक आणि नवयुवक अशी फळी तयार झाली आहे. त्यांच्याकडून प्रत्येक निवडणूक इर्षेने लढवली जाते. त्यातूनच आज पुन्हा बोगस एजंटच्या निमित्ताने दोन्ही गट एकमेकाला भिडले.

टॅग्स :Sangliसांगलीhatkanangle-pcहातकणंगलेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Votingमतदान