शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
2
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
3
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
4
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
5
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
6
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
7
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
8
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
9
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
10
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
11
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
12
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
13
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
15
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
16
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, ५००kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
17
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
18
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
19
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कारची ट्रॅक्टरला पाठिमागून धडक; एकजण जागीच ठार, चौघे जखमी

By घनशाम नवाथे | Updated: June 28, 2024 11:25 IST

मद्यपान करून गाडी चालवल्याने हा अपघात घडला असावा असा पोलिसांचा अंदाज

जत : मोटारीने नांगरणीच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने कारमधील राजन युवराज नायकवडी (वय २७, रा. ढोलेवाडी ता. बत्तीस शिराळा जि.सांगली) जागीच ठार झाला. तर चार जण जखमी झाले आहेत. ही घटना अमृतवाडी फाट्याजवळ जत पासून पाच किलोमीटर अंतरावर गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. मृत राजन हा बत्तीस शिराळाजवळील ढोलेवाडी येथील असून जत येथे आशीर्वाद गोल्ड लोन येथे कामाला होता. नांगरणीच्या ट्रॅक्टरला पाठिमागून कार क्रमांक (एमएच १४ एफएस ०७७०) ने मध्यरात्रीच्या सुमारास धडक दिली. या अपघातात कारमधील राजन हा ठार झाला. तर चारजण जखमी झाले असून दोघांची प्रकृत्ती चिंताजनक आहे. गंभीर जखमी असलेल्या दोघा रुग्णांवर मिरजेच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दोघांच्या वर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विजय उर्फ बंडू कृष्णदेव सांगोलकर (वय ४५, रा. मंगळवेढा), गणेश गायकवाड (२६, रा. आटपाडी), आकाश व्हनमाने (२३, रा. सोलापूर), प्रदीप स्वामी (२३ रा. जत) अशी जखमींची नावे आहेत. घटनास्थळी जाऊन जत पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. मोटारच्या चालकाने मद्यपान करून गाडी चालवल्याने हा अपघात घडला असावा असा जत पोलिसांचा अंदाज आहे. मयत राजन याच्या पश्चात आजी, आजोबा, आई, वडील, एक बहिण असा परिवार आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू