शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आनंदराव पाटील तिसऱ्यांदा सभापतीपदी

By admin | Updated: August 26, 2015 00:27 IST

इस्लामपूर बाजार समिती : सुरेश गावडे दुसऱ्यांदा उपसभापती

इस्लामपूर : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या पदाधिकारी निवडीत मंगळवारी कुणालाच खळखळ करू न देता आ. जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे यांनी विद्यमान सभापती आनंदराव पाटील (साखराळे) यांना, तर उपसभापतीपदी सुरेश गावडे (कासेगाव) यांनाच पुन्हा संधी दिली. पाटील हे तिसऱ्यांदा सभापतीपदी विराजमान होत आहेत, तर उपसभापती पदासाठी गावडे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जयंत पाटील सभागृहात पीठासीन अधिकारी तथा सहायक निबंधक अमोल डफळे यांच्या अध्यक्षतेखाली सभापती आणि उपसभापती निवडीसाठी संचालकांची विशेष सभा झाली. बाजार समिती सचिव विजयकुमार जाधव यांनी सहायक म्हणून काम पाहिले. त्यापूर्वी पक्षश्रेष्ठी रामराव देशमुख, प्रा. शामराव पाटील, विष्णुपंत शिंदे, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, सचिन पाटील यांनी सर्व संचालकांसोबत चर्चा करून आ. जयंत पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली.त्यानंतर मुख्य निवडीच्या प्रक्रियेत सभापती पदासाठी आनंदराव शामराव पाटील (साखराळे) आणि उपसभापती पदासाठी सुरेश शिवाजी गावडे (कासेगाव) यांचे अर्ज दाखल करण्यात आले. पाटील यांना माजी सभापती दिलीप देसाई व अल्लाउद्दीन चौगुले यांनी, तर गावडेंसाठी अ‍ॅड. विश्वासराव पाटील व संपतराव पाटील यांनी सूचक आणि अनुमोदक म्हणून पाठिंबा दिला. विहित वेळेत दोघांचे प्रत्येकी एकेकच अर्ज राहिल्याने सहायक निबंधक अमोल डफळे यांनी सभापती म्हणून आनंदराव पाटील यांची, तर उपसभापतीपदी सुरेश गावडे यांची निवड घोषित केली.आनंदराव पाटील १९९० ते ९२ या कालावधित सभापती होते. त्यानंतर मागील वर्षभरापासून या पदाची धुरा ते सांभाळत होते. या निवडीने त्यांना तिसऱ्यांदा सभापती पदाची संधी मिळाली. यावेळी बाबूराव पाटील, माणिक गायकवाड, शामसुंदर पाटील, शंकर खांबे, बाबासाहेब पाटील, कलगोंडा पाटील, सुभाष शिंगटे, पद्मश्री पाटील, बाळाबाई मस्के, निवास पाटील, संदीप पाटील, दिलीप कदम, नंदकुमार मानकर उपस्थित होते. (वार्ताहर)