शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा टक्के हृदयावर ६६ टक्क्यांची मोहर

By admin | Updated: June 10, 2015 00:30 IST

जिद्द चिकाटीला यशाचे पाठबळ : दिंडनेर्लीतील ज्योती पाटीलच्या यशापुढे गगनही ठेंगणे

सागर शिंदे :दिंडनेर्ली ::जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर हृदयरोगाने त्रस्त असलेल्या दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील ज्योती प्रताप पाटील या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेमध्ये ६६ टक्के गुण मिळवून इच्छा, आकांक्षांच्यापुढे गगनही ठेंगणे पडते याची प्रचिती दिली आहे. वर्षभर दहावीचा अभ्यास केल्यानंतर ऐन परीक्षेच्या तोंडावर हृदयविकाराचे निदान झाल्यानंतर तिच्या आणि आईच्या पायाखालची वाळूच सरकली होती. मात्र, कठीण प्रसंगाला धीराने तोंड देत ती चक्क रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात अभ्यास करून रुग्णवाहिकेतून परीक्षा देऊन तिने उज्ज्वल यश मिळवले.ज्योतीला धाप लागून अत्यवस्थ वाटू लागल्याने तिला तातडीने उपचारासाठी कोल्हापुरातील दवाखान्यात दाखल केले. तपासणी केल्यानंतर मात्र तिला व तिच्या आईवर आभाळच कोसळले. कारण ज्योतीचे हृदय नेहमीप्रमाणे काम करीत नसल्याने ते प्रसरण पावले आहे. त्यामुळे फुप्फुसात पाणी झाले होते. ते पाणी डॉक्टरांनी काढून टाकले आहे. हृदयविकाराची कार्यक्षमता एकदमच कमी झाल्याने तिला हॉस्पिटलमधून बाहेर काढणेही धोकादायक वाटत होते. त्यावेळी तिचे हृदय फक्त १५ टक्केच काम करीत होते. त्यामुळे तिच्या जीविताला धोका होता; पण दोन दिवसांनी दहावीची वार्षिक परीक्षा... व ती नाही दिली, तर आतापर्यंतचे सर्व श्रम वाया जाणार... त्यामुळे ज्योतीने सर्वांपुढे हट्ट धरून उपचार सुरू असतानाच परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. तिची जबरदस्त इच्छाशक्ती पाहून परीक्षेला जाण्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका व दोन डॉक्टरही तिच्यासोबत दिले. करवीर तालुक्यातील इस्पुर्ली येथील परीक्षा केंद्रावर तिला स्पेशल केस म्हणून तिची स्वतंत्र बैठक व्यवस्था केली. मात्र, ज्योतीने स्पेशल केस नाकारत सर्व विद्यार्थ्यांसोबतच परीक्षा दिली. पेपर संपताच पुन्हा तिच्यावरील उपचार सुरू होत होते. हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागातही तिचा अभ्यास सुरूच व्हायचा. चार वर्षांपूर्वीच ज्योतीच्या वडिलांचे निधन झाले आहे. करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली या गावात ज्योती आणि तिची आई, तिचा मामा सचिन मेटील यांच्याकडेच राहते. आई मोलमजुरी करून घरखर्च भागवते. त्यामुळे आपण मोठे होऊन आईला मदत करायची तिची इच्छा आहे. हृदयविकाराचे निदान अचानक झाल्याने ज्योतीच्या आईला अजूनही हे स्वीकारणं जड जातंय. मात्र, ज्योतीला पुन्हा पूर्ववत करण्यासाठी आता तिची धडपड सुरू आहे. तिच्या या कष्टाचे फळ तिला या निकालाच्या निमित्ताने मिळाले; पण त्याचबरोबर ज्योतीच्या जिद्दीने सर्वांनाच थक्क केले आहे. अभ्यास झाला नाही म्हणून परीक्षा टाळणारे किंवा परीक्षेच्या भीतीने आयुष्यच संपविणारे अनेकजण पाहायला मिळतात; पण परीक्षेच्या तोंडावर मोठा आजार उद्भवलेला असतानाही धैर्याने परीक्षेला सामोरे जाणाऱ्या ज्योतीचं कौतुक होत आहे. आपल्या यशामध्ये अडचणीच्या, दु:खाच्या प्रसंगी प्रत्येक क्षणाला सोबत असणारी आपली आई, मामा, आजी, आजा, शिक्षक, डॉक्टर, मित्र-मैत्रिणी यांचा वाटा मोलाचा असल्याचे मत ज्योतीने सांगितले.