शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता : जबाबदारी निश्चितीसाठी हे उपाय करुन पहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 12:54 IST

शालेय विद्याथ्र्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी सगळ्यांचीच, पण कुणी एक जबाबदार नाही असं कसं चालेल?

ठळक मुद्देशाळा-पालक आणि शिक्षक या तिन्ही घटकांवर मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे.

- डॉ.  अनिल  मोकाशी 

शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा, शालेय वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आहे. शाळेतील मुलांची सुरक्षा ही व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी योग्य व्यक्तींना नेमून द्यावी लागते. ‘सगळेच जबाबदार’ म्हटल्यावर ‘कोणीच जबाबदार’ रहात नाही. मात्र त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटत नाही. त्यासठी हे काही उपाय करुन पहायला हवेत. व्यवस्थापनाने व मुख्याध्यापकांनी शाळेतील शिक्षकांपैकी एक ‘बाल सुरक्षा अधिकारी’ नेमावा. त्याने सुरक्षा नियम व व्यवस्थापन शिकून घ्यावे. आपली टीम बनवावी. तिचे नेतृत्व करावे. शाळा सुरक्षा अधिकारी, मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, क्लास मॉनिटर या सर्वांनी मिळून एकित्रतपणे सुरक्षा हा विषय हाताळावा. शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचे सुरक्षा, प्रथमोपचार प्रशिक्षण आयोजित करावे. फक्त शाळेतीलच नाही तर घरातील, समाजातील, रस्त्यावरील, आरोग्याची सुरक्षा शिकवण्याची जबाबदारी घ्यावी. शाळेच्या प्रवेशद्वारावर जबाबदार कर्मचारी नेमावा. त्याने आलेला विद्यार्थी शिक्षकांच्या ताब्यात आणि जाणारा विद्यार्थी पालकांच्या ताब्यात देण्याचा नियम पाळावा. ताबा घेणार्‍या  पालक / पालक प्रतिनिधीची शाळेत नोंद असावी. परिसरातील संशयास्पद हालचालींवर लक्ष असावे. त्यांची नोंद असावी. अहवाल असावा. वाहनचालकांचे नाव, पत्ता, फोन नंबर, ओळखपत्नाची शहानिशा व्हावी. शाळेची बस असेल तर कडक शिस्तीत नियमांचे पालन व्हावे. ताबा घेणे व ताबा देणे गंभीरपणे नोंदीसह करावे. शाळेच्या परिसरात, पटांगणावर मुले जबाबदार व्यक्तीच्या नजरेच्या टप्प्यात असावी. प्रथमोपचार पेटी असावी. घडणार्‍या  घटनांची लेखी नोंद असावी. घटनेचे तपशीलवार वर्णन असावे. साक्षिदारांच्या सह्या असाव्या. फलकावर इमर्जन्सी फोन नंबर असावे. शालेय सुरक्षा अधिकारी, मुख्याध्यापक, व्यवस्थापन, डॉक्टर, अ‍ॅम्बुलन्स, अगAीशामक दल, पोलीस यांचे संपर्क क्रमांक ठळक लावलेले असावेत.काही गंभीर आरोग्य समस्या उद्भवल्यास ठराविक डॉक्टरांकडे नेण्यासाठी त्या डॉक्टरांची व सर्व पालकांची लेखी पूर्वसंमती घ्यावी. जवळपासचा डॉक्टर निवडावा. डॉक्टरांची फी तसेच औषधोपचाराच्या खर्च ही पालकांची जबाबदारी असेल अशी पालकांची पूर्वसंमती लेखी स्वरूपात घ्यावी. बाल शोषण ही एक गंभीर समस्या आहे. बाल शोषण ओळखणे, प्रतिबंध, उपाय यांचे नियोजन हवे. शोषण शारीरिक, लैंगिक, मानिसक किंवा दुर्लक्ष या स्वरूपात असू शकते. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा मुलांशी येणारा ‘नजरेआड संपर्क’ टाळावा. अशा जागा व प्रसंग टाळावे. बाहेरून शाळेत येणार्‍या कंत्नाटी कामगारांवर नजर ठेवण्याची जबाबदारी नेमून द्यावी. शारीरिक शिक्षा हा आता एक गुन्हा आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. शिक्षेच्या भितीने नाही तर कौतुकाच्या अपेक्षेने मुले चांगली वागतात. बाल शोषणाची लक्षणे आढळल्यास लगेच नोंद करावी. पालकांना, व्यवस्थापनाला लेखी स्वरूपात कळवावे. मानिसक समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. एखाद्याच्या जीवावर बेतेल. मुलांची भांडणे, दादागिरी, गुंडिगरी, रॅगिंग, व्यसने, अनैतिकता यांची हाताळणी कुशलतेने करावी. मी का मधे पडू?  मला काय त्याचे? असा दृष्टीकोन एखादे वेळी अंगलट येतो. अपंगांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी. आत्तापर्यंत पालकांनी, शाळांनी, समाजानी व सरकारनी या विषयाला हातच घातलेला नाही. भावी पिढीला रामभरोसे सोडून आता चालणारच नाही. कृती ही करावीच लागेल.

 

लेखक बारामती स्थित  प्रख्यात  बालरोग  तज्ज्ञ आहेत.