शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ब्राउन हेरॉईनसह तिघे ताब्यात, रत्नागिरीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 14:12 IST

रत्नागिरी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री पेट्राेलिंग करताना तिघांना एक लाख ४५ हजार ७५० रुपयांच्या ब्राउन ...

रत्नागिरी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री पेट्राेलिंग करताना तिघांना एक लाख ४५ हजार ७५० रुपयांच्या ब्राउन हेराॅईनसह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई रत्नागिरी शहरातील एकतानगर येथे करण्यात आली.

रउफ इक्बाल डोंगरकर (३५, रा. उर्दू स्कूलजवळ कर्ला, रत्नागिरी), नझीर अहमद मोहम्मद वस्ता (३८, रा. वस्ता मोहल्ला राजीवडा, रत्नागिरी) आणि राहिल अजिज सुवर्णदुर्गकर (२९, रा. राजीवडा बांध, रत्नागिरी) अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत.

पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके तयार करून महत्त्वाच्या ठिकाणी पेट्रोलिंग सुरू केली आहे. हे पथक गुरुवारी शहर परिसरातून पेट्रोलिंग करत असताना त्यांना एकतानगर येथे तिघांच्या हालचाली संशयास्पद दिसल्या. पोलिसांनी त्यांची चौकशी करून तपासणी केली असता त्यांच्याकडून ब्राउन हेरॉईन या अमली पदार्थाच्या ४०५ पुड्या सापडल्या. त्याची किंमत एकूण १ लाख ४५ हजार ७५० रुपये इतकी आहे. या तिघांवर एन. डी. पी. एस. ॲक्ट कलम ८ (क), २१ (ब), २९ अन्वये रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस हेड काॅन्स्टेबल शांताराम झोरे, विजय आंबेकर, दिवराज पाटील आणि विवेक रसाळ यांनी केली.

घरफाेड्या, चाेऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पेट्राेलिंग

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घरफोड्या व चाेऱ्यांना प्रतिबंध करण्याच्या तसेच अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करण्याबाबत पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार पेट्राेलिंग करताना शहरातील एकतानगर येथे अमली पदार्थाचा साठा सापडला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिस