शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बारसू रिफायनरीचे सर्वेक्षण थांबवा, काँग्रेसतर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन

By शोभना कांबळे | Updated: April 24, 2023 18:13 IST

..तर खारघरची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही

रत्नागिरी : प्रशासनाकडून लवकरच बारसू रिफायनरीचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण थांबवावे, अशी मागणी काॅंग्रेसतर्फे करण्यात आली आहे. याबाबत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे निवेद दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे की, राजापूर तालुक्यात उन्हाळा सुरू झाला आहे. कडक उन्हाळ्यात सर्वेक्षण सुरू केल्याने रिफायनरी विरोधी जनता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरेल त्यामुळे मोठा उद्रेक होऊ शकतो. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात खारघर येथे सरकारच्या बेपर्वा वृत्ती व नियोजन शून्य आयोजनामुळे नागरिकांचा मृत्यू झाला. बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणावेळी जनता माळरानावर एकवटल्यास खारघरची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निवेदनात म्हटले आहे.स्थानिक जनतेचा बारसू रिफायनरीला असलेला विरोध लक्षात घेता, बारसू रिफायनरी सर्वेक्षणचे काम थांबवावे, अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. हे निवेदन देताना महिला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रुपाली सावंत, जिल्हा उपाध्यक्ष हारिस शेकासन, शहर अध्यक्ष रमेश शाहा, माजी तालुकाध्यक्ष प्रसाद उपळेकर, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा सरचिटणीस आतिफ साखरकर उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पcongressकाँग्रेस