शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संथ प्रशासकीय यंत्रणा उद्योगाला त्रासदायक

By admin | Updated: October 9, 2015 22:10 IST

धनंजय दातार : कामगार कायद्याच्या पालनाबाबत परदेशांमध्ये कार्यतत्परता

रत्नागिरी : दुबईतील शासकीय निर्णय अतिशय जलद आहेत. आपल्याकडील प्रशासकीय यंत्रणा अतिशय संथ आहे. त्यामुळे कामाला लगेचच सुरुवात करता येत नाही. तसेच कामगार कायद्याचे पालनही तिथे चांगल्या तऱ्हेने होते. त्यामुळे कामगारांना हक्क लगेचच दिला जातो, मात्र, आपल्याकडे त्याची कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी होत नसल्याची खंत दुबईस्थित प्रसिद्ध मसाले उद्योजक धनंजय दातार यांनी आज (शुक्रवारी) पत्रकारांसमोर व्यक्त केली. येथील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात धनंजय दातार यांचे ‘स्वकर्तृत्त्वातून यशस्वी वाटचाल’ या विषयावर आज (शुक्रवारी) व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटीदेखील मांडल्या.मूळ चिपळूण येथील असणाऱ्या दातार कुटुंबाच्या मागील तीन पिढ्या अकोल्यात स्थायिक झाल्या. दुबईत उद्योग विस्तार करताना आपण महाराष्ट्रातील कामगारांना प्राधान्य दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रातील मुले मुंबई, पुण्याला सहजच जातात, पण तिथून पुढे जाण्याचे धाडस करीत नाहीत. ते त्यांनी करायला हवे. संधीचा फायदा कसा घ्यावा, हे आपल्यावर अवलंबून आहे, असे म्हणाले.दातार यांनी दुबईतील अनुभव व्यक्त करताना सांगितले की, आपल्याकडे कामगारांना दिला जाणारा पगार अतिशय कमी आहे, त्या तुलनेने परदेशात कितीतरी पटीने जास्त असतो. तसेच कामगार कायद्याचेही पालन चांगल्या तऱ्हेने केले जाते. मात्र, आपल्याकडे कामगार संघटनांकडूनही कामगारांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. कामगार कायद्याबाबत आखाती देशात कुठलाही कर नसल्याने त्याचा फायदा उद्योजकांना घेता येतो, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, कामावर श्रद्धा हवी, पडेल ते काम करण्याची तयारी हवी, नवनवीन शिकण्याची इच्छा असेल आणि जबाबदारी घेण्याची तयारी असेल तर मोठे बनता येते. कोकणामध्ये डेव्हलपमेंट असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी वंदना दातार, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे, कार्यवाह प्राची जोशी, उद्योजक आनंद देसाई, प्रज्ञा भिडे, अमित उकेरीकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)मूळचे चिपळूण येथील असणारे दातार कुटुंबाच्या मागील तीन पिढ्या अकोल्यात स्थायिक झाल्या आहेत. दुबईत त्यांनी आपला उद्योग विस्तार वाढवला आहे. महाराष्ट्रातील कामगारांना प्राधान्य दिले आहे.