शहरं
Join us  
Trending Stories
1
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
2
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
3
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
4
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
5
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
8
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
9
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
10
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
11
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
12
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
13
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
16
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
17
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
18
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
20
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेमार्गावरील विशेष कृती दलाच्या जवानांची सेवा संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:34 IST

खेड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणमार्गावरील चाकरमान्यांच्या वाढत्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी रेल्वेस्थानकांत तैनात केलेले विशेष कृती दलाचे जवान आता ...

खेड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणमार्गावरील चाकरमान्यांच्या वाढत्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी रेल्वेस्थानकांत तैनात केलेले विशेष कृती दलाचे जवान आता आपल्या मुख्यालयात परतले आहेत. रेल्वे प्रशासनाने ४ सप्टेंबरपासून रेल्वेच्या विशेष कृती दलाची कुमक त्या-त्या स्थानकात तैनात केली होती. गेले १८ दिवस ड्युटी बजावणाऱ्या विशेष कृतीदलाच्या मदतीला स्थानिक पोलीस व गृहरक्षकदलाचे जवानही होते.

गतवर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे चाकरमान्यांना कोकणात आपल्या गावी येण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, प्रशासनाने यावर्षी रेल्वे प्रवासात काही अटी व शर्ती ठेवून चाकरमान्यांना प्रवासाची सेवा उपलब्ध करून दिली. या संधीचा लाभ घेत चाकरमान्यांनी गणेशोत्सवासाठी गावी येणे पसंत केले होते. रेल्वे प्रशासनानेही गणेशोत्सवासाठी तब्बल २२४ गणपती स्पेशलच्या फेऱ्या चालवल्या. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोकण मार्गावरील रेल्वे स्थानकांवर १०० हून अधिक रेल्वे सुरक्षा बल तैनात होते. शस्त्रधारी पोलिसांमुळे गणेशभक्तांनाही दिलासा मिळाला होता.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरक्षण असणाऱ्या प्रवाशांनाच रेल्वेस्थानकात प्रवेश दिला जात होता. यासाठी दिवसरात्र विशेष कृती दलाने व्यवस्था बजावली. रेल्वेस्थानकात विशेष कृती दलाच्या दिमतीला स्थानिक पोलीस व गृहरक्षकदलही होते. कोकण मार्गावर धावणाऱ्या सर्वच गणपती स्पेशल गाड्या तूर्तास बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची रेल्वेस्थानकात गर्दी कमी झाली आहे. कोकण मार्गावरील विविध रेल्वेस्थानकांत सलग १८ दिवस तळ ठोकत जागता पहारा देणाऱ्या विशेष कृती दलाची सेवाही संपुष्टात आल्याने त्यांनीही परतीची वाट धरली.

रेल्वेस्थानकात तैनात आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांनीही तपासणीवर भर दिल्याने कोरोना नियंत्रणात राहण्यास तितकीच मदत झाली. मुंबई-गोवा महामार्गावरही वाहतूक पोलिसांच्या बंदोबस्तालाही पूर्णविराम मिळाला. महामार्गावर वाहतूककोंडी होऊन चाकरमान्यांचे हाल होऊ नयेत, यासाठी २५ हून अधिक वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी गणेशोत्सव कालावधीत दिवसरात्र ड्युटी बजावली.