शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
3
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
4
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
5
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
6
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
7
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
8
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
9
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
10
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
11
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
12
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
13
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
14
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
15
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
16
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
17
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
18
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
19
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
20
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीकरांना प्रांताधिकाऱ्यांची ३ महिने प्रतीक्षा

By admin | Updated: June 24, 2016 00:44 IST

तीन महिन्यानंतरही अधिकारी नाही : जातीचे, नॉन क्रिमिलेअर दाखल्यांचा निपटारा करताना होतेय कसरत

रत्नागिरी : रत्नागिरीच्या प्रांताधिकारीपदी कार्यरत असलेले प्रसाद उकार्डे यांची मार्च महिन्यात बदली झाली आहे. मात्र, त्यांच्या बदलीला आता तीन महिने होत आले तरी अजूनही त्यांच्या पदावर नियुक्ती न झाल्याने रत्नागिरी व संगमेश्वरवासीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच शैक्षणिक प्रवेशासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या सहीनिशी आवश्यक असणारे जातीचे तसेच नॉन क्रिमिलेअर दाखल्यांचा निपटारा होताना कसरत करावी लागत आहे.
रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद उकार्डे यांची मार्च महिन्यात नाशिक येथे बदली झाली. त्यांचा अतिरिक्त कार्यभार चिपळूणचे प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांच्याकडे देण्यात आला होता. त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी विजय राठोड रत्नागिरीत आल्यानंतर त्यांच्याकडे मे महिन्यात या पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्याही प्रशिक्षणाची मुदत संपल्याने ते पुढील प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्यामुळे आता पुन्हा ही जबाबदारी हजारे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याकडे चिपळूणचाही पदभार असल्याने ते रत्नागिरीत आल्यानंतर दाखल्यांवर सह्या होत आहेत.
सध्या शैक्षणिक प्रवेशासाठी मुलांची आणि पालकांची विविध दाखल्यांसाठी पळापळ सुरू आहेत. नायब तहसीलदार, तहसीलदार यांच्या सहीने मिळणारे दाखले चटकन मिळत आहेत. मात्र, जातीच्या तसेच नॉन क्रिमीलेअर, आदी दाखल्यांवर प्रांताधिकारी यांचीच सही आवश्यक असल्याने हे दाखले मिळण्यासाठी रत्नागिरीतील नागरिकांची मोठी अडचण होत आहे.
त्यातच चिपळूण प्रांताचा कार्यभार सांभाळतानाच रत्नागिरीचाही अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे. रत्नागिरी आणि चिपळूण ही दोन्हीही कार्यक्षेत्रे मोठी असल्याने प्रांताधिकारी हजारे यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. चिपळूण येथील महत्वाच्या सुनावणी, निर्णय मार्गी लावतानाच रत्नागिरीतील कामाचा आवाका सांभाळावा लागत आहे. त्यातच आता दाखल्यांसाठी विद्यार्थी आणि पालक यांचीही धावपळ झाली आहे. त्यामुळे दोन्हीकडील कामांचे महत्व लक्षात घेऊन हजारे यांना आठवड्यातील काही दिवस रत्नागिरीला द्यावे लागत आहेत. यामुळे कामांचा निपटारा करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेले तीन महिने रत्नागिरीला नवीन प्रांताधिकारी देण्यात आलेला नाही. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. रत्नागिरीकर नव्या प्रांताधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. (प्रतिनिधी)


शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने त्याठिकाणी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची धावपळ सुरू आहे. शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विविध प्रकारचे दाखले जमा करावे लागत आहेत. प्रांत कार्यालयात या दाखल्यांसाठी गर्दी होत असून, प्रांताधिकारी नसल्याने या दाखल्यांचा निपटारा होत नाही.