शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 11:47 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अलसुरे येथील भोस्ते गावात दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना अत्यंत दुर्दैवी घटना घडली.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अलसुरे येथील भोस्ते गावात दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना दोन जण जगबुडी नदीत बुडाले. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. तर, दुसऱ्या तरुणाने कसेबसे पोहत किनारा गाठला. गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मंगेश पाटील (वय, ४०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंगेश पाटील हे खेड तालुक्यातील भोस्ते पाटीलवाडीचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. यावर्षी पहिल्यांदाच त्यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले होते. दरम्यान, गुरुवारी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी मंगेश पाटील आणि त्यांच्यासोबत आणखी एक तरुण नदीपात्रात उतरले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पाण्यात बुडू लागले. त्यापैकी दुसर्‍या तरुणाने कसेबसे पोहत किनारा गाठला. पण मंगेश पाटील हे पाण्यात बुडाले.

या घटनेची माहिती मिळताच खेड नगर परिषदेचे अग्निशामक दल, खेड शहरातील विसर्जन कट्टा पथक तसेच खेड रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. सर्व यंत्रणेने तातडीने मंगेश पाटील यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरु होता.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच माजी आमदार संजय कदम यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच खेड तालुका प्रशासन अधिकारी, खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक त्यांच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनीही घटनास्थळी हजेरी लावून मदतकार्यात समन्वय साधला.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनRatnagiriरत्नागिरीMaharashtraमहाराष्ट्रGanesh Mahotsavगणेशोत्सव 2025