रत्नागिरी : चक्रीवादळाची शक्यता, नौकांना परतण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 08:53 PM2021-05-13T20:53:49+5:302021-05-13T20:56:14+5:30

Cyclone : सूचनांची दखल घेत कोस्टगार्डने समुद्री गस्त अधिक करडी केली आहे. कोकण किनारपट्टीलगतच्या ५ किलोमीटर भागात सतर्कतेचे आदेश.

Ratnagiri Chance of cyclone warning to return boats | रत्नागिरी : चक्रीवादळाची शक्यता, नौकांना परतण्याचा इशारा

रत्नागिरी : चक्रीवादळाची शक्यता, नौकांना परतण्याचा इशारा

Next
ठळक मुद्देसूचनांची दखल घेत कोस्टगार्डने समुद्री गस्त अधिक करडी केली आहे. कोकण किनारपट्टीलगतच्या ५ किलोमीटर भागात सतर्कतेचे आदेश.

रत्नागिरी : अरबी समुद्रात तयार होत असलेले तोक्ते चक्रीवादळ १५ आणि १६ मे या दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवरून पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागाला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. गुरूवारी समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौकांनाही किनार्यावर परत पाठवण्यात आले.

अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ तयार होत असलेल्या या तोक्ते चक्रीवादळामुळे केरळ, तामिळनाडू आणि कोकण भागात मोठ्या प्रमाणात वारे वाहण्याची आणि त्याचबरोबर पावसाचीही शक्यता आहे. या वादळाची दिशा अजून निश्चत नसली तरी कोकण किनारपट्टीलगतच्या ५ किलोमीटर भागात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.



या सूचनांची दखल घेत कोस्टगार्डने समुद्री गस्त अधिक करडी केली आहे. या गस्ती नौकेकडून समुद्रात दवंडी पिटली जात असून, वादळाबाबत नौकांना माहिती दिली जात आहे. गुरूवारी खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या पाच नौकांना किनाऱ्यावर परत पाठवण्यात आले.

Web Title: Ratnagiri Chance of cyclone warning to return boats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.