शहरं
Join us  
Trending Stories
1
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
2
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
3
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
4
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
5
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
8
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
9
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
10
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
11
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
12
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
13
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
16
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
17
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
18
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
20
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्ध जीवन’ची मालमत्ता कोतवडेतही

By admin | Updated: June 24, 2016 01:12 IST

पुणे सीबीआयचा छापा : संगणक, कागदपत्रे जप्त?

रत्नागिरी : कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी वादात सापडलेल्या पुण्यातील समृद्ध जीवन फुडस् इंडिया लिमिटेड या कंपनीची जागा रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथे असल्याचे निष्पन्न झाले आहे. कंपनीच्या या २७ एकर जागेत पसरलेल्या फार्महाऊसवर गुरुवारी पुणे केंद्रीय गुन्हा अन्वेषण (सीबीआय) पथकाने छापा टाकून काही कागदपत्रे व संगणक जप्त केला असल्याचे समजते.
२०१२ सालापासून ही कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या कंपनीने असंख्य छोट्या गुंतवणूकदारांकडून भरमसाट ठेवी गोळा केल्या होत्या. २०१३ साली ‘सेबी’ने (सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड) या संस्थेवर कारवाई केली. ‘सेबी’च्या मनाई असलेल्या वित्त कंपन्यांच्या यादीमध्ये समृद्ध जीवनचा समावेश करण्यात आला. या कंपनीचे अध्यक्ष महेश मोतेवार यांना डिसेंबर २०१५मध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर एप्रिलमध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली.
असंख्य ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले असल्याने या कंपनीच्या नावावर असलेल्या मालमत्तांवर टाच आणण्याची मागणी न्यायालयाकडे केली गेली होती. त्याला न्यायालयाने मान्यताही दिली. त्यानंतर कंपनीच्या मालमत्तांचा शोध सुरू करण्यात आला. यात रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथे २७ एकर जागा कंपनीच्या नावावर असल्याची माहिती पुढे आली. तेथे एक फार्महाऊसही उभारण्यात आले आहे. या फार्महाऊसवर गुरुवारी पुण्याच्या केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकला. या फार्महाऊसवर असलेल्या संगणकातील हार्डडिस्क आणि काही कागदपत्रे जप्त करण्यात आली असल्याचे समजते. (प्रतिनिधी)