शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई - गोवा महामार्गावरील झरा भागवतोय तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 11:46 IST

Highway, Water, Rajapur, Ratnagirinews मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामामुळे गेले वर्षभर तालुक्यातील कोदवली तेथील एक स्वच्छ पाण्याचा झरा सर्वांचे खास आकर्षण बनला आहे. या झऱ्याला शुध्द व स्वच्छ पाणी येत असल्याने महामार्गावरुन प्रवास करणारे अनेक प्रवासी येथून पाण्याच्या बाटल्या भरुन नेताना दिसतात.

ठळक मुद्देराजापूर तालुक्यातील कोदवली येथे आढळला झराडोंगरातून येणारा झरा प्रवाशांचे आकर्षण

राजापूर : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामामुळे गेले वर्षभर तालुक्यातील कोदवली तेथील एक स्वच्छ पाण्याचा झरा सर्वांचे खास आकर्षण बनला आहे. या झऱ्याला शुध्द व स्वच्छ पाणी येत असल्याने महामार्गावरुन प्रवास करणारे अनेक प्रवासी येथून पाण्याच्या बाटल्या भरुन नेताना दिसतात.राजापूर शहरापासून काही अंतरावर व कोदवली हद्दीत हा झरा आहे. गेली दोन वर्षे मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असून, त्या दरम्यान कोदवली येथील एक अवघड वळण काढून बाजूला असलेला डोंगर पोखरुन त्यामधून मार्ग काढताना खोदकामादरम्यान एका ठिकाणी अचानक पाण्याचा झरा सापडला.

सुरुवातीला एखादी पाईपलाईन फुटली असेल किंवा जमिनीतून पाणी बाहेर येत असावे, असे महामार्गाचे काम करणाऱ्या कामगारांना वाटले. मात्र, बाहेर पडणारे पाणी स्वच्छ होते. त्यावेळी काहींनी त्याची चव चाखली असता, ते गोड असल्याचे जाणवले.गोड्या पाण्याचा स्रोत असेल, असा विचार करुन डोंगरातून वाहणारा तो झरा न बुजवता महामार्गाच्या बांधकामादरम्यान त्या डोंगरातून एका पाईपद्वारे पाणी बाहेर काढण्यात आले आहे. या भागातील महामार्गाचे काम पूर्ण झाले असून, वाहणाऱ्या झऱ्याजवळील संरक्षक भिंत बांधून पूर्ण झाली आहे. त्यामधून एका पाईपद्वारे तो झरा पाण्याच्या प्रवाहरुपात वाहत आहे.पावसाळा असो किंवा त्यापूर्वीचा उन्हाळा असो या झऱ्याच्या प्रवाहात जराही फरक पडलेला नाही. प्रवाह कधी कमी-जास्त झाल्याचेही आढळून आलेले नाही. या झऱ्याच्या वरील बाजूला जल असे दगडावर पिवळ्या रंगाने लिहिले आहे. महामार्गावरील हा झरा तहानलेल्यांसाठी हक्काचे ठिकाण बनला आहे. 

टॅग्स :Waterपाणीhighwayमहामार्गTrafficवाहतूक कोंडीRajapurराजापुरRatnagiriरत्नागिरी