शहरं
Join us  
Trending Stories
1
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
2
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
3
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
4
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
5
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
8
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
9
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
10
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
11
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
12
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
13
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
16
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
17
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
18
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
20
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात उलगडणार स्वातंत्र्यवीरांचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:34 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नसून त्यासाठी लढे, क्रांतिकारी चळवळी यासह अनेक क्रांतिकारकांना प्राणांची आहुती ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नसून त्यासाठी लढे, क्रांतिकारी चळवळी यासह अनेक क्रांतिकारकांना प्राणांची आहुती द्यावी लागली. हा संपूर्ण इतिहास भावी पिढीला कळावा व त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी मार्गताम्हाने विद्यालय भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यवीरांचा इतिहास उलगडणार आहे. १ ऑक्टोबर २०२१ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हा उपक्रम होणार असल्याची माहिती अध्यक्ष मधुकर चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

त्यांनी सांगितले की, आज भावी पिढीला इतिहासाची ओळखच नसल्याने त्यांच्या मनात देशभक्तिपर बिजे पेरण्याची खऱ्याअर्थाने गरज भासू लागली आहे. इतिहासावर आधारित या कार्यक्रमातून त्यांना इतिहासाची ओळख करून दिल्यास त्यांच्या मनावर इतिहास बिंबावेल. यामध्ये १ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाची रूपरेषा, २ रोजी गांधी जयंतीनिमित्त ‘भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, उत्सव स्वातंत्र्याचा, गौरव स्वातंत्र्यवीराचा’ या कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर ‘स्वातंत्र्य आंदोलनातील अभिनव भारत संघटनेचे योगदान'' या विषयावरील व्याख्यानानंतर खऱ्याअर्थाने या कार्यकमाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या क्रांतिकारकांविषयी निबंध व एकपात्री अभिनव स्पर्धा, यासह विविध स्पर्धा, व्याख्यान, परिसंवाद, तसेच स्वतंत्र भारताचे संरक्षण करणारे माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता यांचे संमेलन, शोभायात्रा, चित्ररथ असे उपक्रम राबविले जाणार आहेत.

तसेच कीर्तनकार चारुदत्त आफळे बुवा यांचे व्याख्यान हाेणार आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा गांधी, महात्मा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या अनेक महापुरुषांचा इतिहास व त्यांचे योगदान याची माहिती यावेळी दिली जाणार आहे. १५ ऑगस्ट रोजी या कार्यक्रमांची सांगता होणार असून, या दिनी ध्वजारोहणासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला तिरंगा ध्वज दिला जाणार आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष जयसिंग मोरे, सचिव मोहन चव्हाण, सहसचिव अजित साळवी, खजिनदार मनोहर चव्हाण, सदस्य शशिकांत चव्हाण, कृष्णा चव्हाण, प्राचार्य विजयकुमार खोत, मुख्याध्यापक संदीप गोखले, प्रा. राजश्री कदम आदी उपस्थित होते.