रत्नागिरी : पंधरा मिनिटे झालेले वादळ आणि त्यानंतर पाऊणतास पडलेला मुसळधार पाऊस यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक फटका महावितरणला बसला. जिल्ह्यातील नऊ उपकेंद्रे ठप्प झाल्यामुळे त्यातील एक लाख ११ हजार ४८५ ग्राहकांना शनिवारची रात्र अंधारात काढावी लागली.
वादळवारे आणि पावसामुळे रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यातील वीज यंत्रणा विस्कळीत झाली. जिल्ह्यात महावितरणचे उच्चदाब वाहिनीचे १०८ पोल, लघुदाब वाहिनीचे २३५ खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला.
पाऊस थांबताच महावितरणची यंत्रणा कामाला लागली. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अखंडितपणे काम सुरू होते. रविवारी सायंकाळपर्यंत जवळपास ८५ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत झाला. मात्र, २६ हजार ३२५ ग्राहक रविवारी सायंकाळीही अंधारातच होते.
Web Summary : Severe storm and rain disrupted power in Ratnagiri, affecting over 111,000 consumers. Nine substations failed, causing widespread outages. While power was restored to 85,000 by Sunday evening, 26,325 remained without electricity due to damaged power lines and poles.
Web Summary : रत्नागिरी में तूफान और बारिश से बिजली आपूर्ति बाधित, 111,000 से अधिक उपभोक्ता प्रभावित। नौ उपकेंद्र ठप्प होने से व्यापक कटौती हुई। रविवार शाम तक 85,000 घरों में बिजली बहाल, लेकिन क्षतिग्रस्त लाइनों के कारण 26,325 अंधेरे में रहे।