शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

चिऱ्याच्या टेम्पोमुळे फूट ब्रीज पडला

By admin | Updated: January 1, 2015 00:18 IST

चिपळुणात खळबळ : दोन दिवसात पुलाच्या कामाला होणार सुरुवात

चिपळूण : शहरातील पाग उघडा मारुती मंदिर ते जोशी आळीला जोडणारा ४० वर्षांपूर्वीचा जुना फूट ब्रीज कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या पुलावरून चिऱ्याचा टेम्पो गेल्याने पूल कोसळला, असे सांगण्यात येत आहे.पाग जोशी आळीतील उघडा मारुती मंदिर ते विरेश्वर देवस्थान परिसराला जोडणारा हा पूल ४० वर्षांपूर्वी माजी नगरसेवक पुरुषोत्तम भागवत यांच्या पुढाकाराने बांधला होता. हा पूल केवळ पादचाऱ्यांसाठी होता. त्यावरुन लहान वाहने जात होती. अवजड वाहतूक या पुलावरुन फारशी होत नसे. खूप वर्षे झाल्याने पादचारी पुलाची दुरवस्था झाली होती. मंगळवारी दुपारपासून या मार्गावर चिऱ्याची वाहतूक होत होती. दोन फेऱ्या पूर्ण झाल्या. तिसऱ्या फेरीच्यावेळी २०० चिरे घेवून टेम्पो जात असताना चिऱ्याच्या वजनामुळे पुलाचा वरील भाग तुटला व टेम्पोची बॉडी अडकली. यावेळी मोठा आवाज झाल्याने स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. कामगारांमार्फत चिरे बाजूला करुन गाडी रिकामी करण्यात आली. रात्री क्रेनच्या सहाय्याने ही गाडी बाहेर काढण्यात आली. या अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक नगरसेवक मोहन मिरगल, शशिकांत मोदी, प्रभारी नगराध्यक्ष लियाकत शाह, फैसल पिलपिले, मुख्याधिकारी प्रकाश पाटील, मंगेश पेढांबकर यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.या पुलाच्या कामाला पालिकेची मंजुरी मिळाली आहे. परंतु, आचारसंहितेमुळे हे काम रखडले होते. दोन दिवसात ठेकेदाराला वर्कआॅर्डर देवून हे काम सुरु केले जाईल असे मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले. पुलाच्या कामास दोन दिवसात सुरूवात होणार असल्याने कालांतराने या परिसरातील वाहतूक पुन्हा सुरू होईल. मात्र अशा प्रकारानंतर संबंधित यंत्रणेला जाग येणार काय असा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)